…म्हणून रेखा यांचा ‘कोरोना’ चाचणी करुन घेण्यास नकार

लक्षण नसल्यामुळे कोरोना चाचणीला रेखा यांनी नकार दिला आहे. आपल्या मॅनेजरमार्फत रेखा यांनी महापालिका अधिकाऱ्याला निरोप पोहोचवला

...म्हणून रेखा यांचा 'कोरोना' चाचणी करुन घेण्यास नकार

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी ‘कोरोना’ चाचणी करुन घेण्यास तूर्तास नकार दिला आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाला रेखा यांनी बंगल्यात प्रवेश नाकारला. (Actress Rekha refuses COVID test)

सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. रेखा यांनी ‘कोरोना’ चाचणी करुन घेण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त दोनच दिवसांपूर्वी आले होते. मात्र आता त्यांनी नकार दिल्याची माहिती महापालिकेचे अधिकारी संजय फुंदे यांनी दिली.

लक्षण नसल्यामुळे कोरोना चाचणीला रेखा यांनी नकार दिला आहे. आपल्या मॅनेजरमार्फत रेखा यांनी महापालिका अधिकाऱ्याला निरोप पोहोचवला. लक्षण दिसलं तर रेखा स्वत: चाचणी करतील, असे त्यांच्या मॅनेजरने सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

महापालिकेचं पथक सर्व्हेसाठी काल रेखा यांच्या बंगल्याजवळ गेलं होतं. मात्र रेखा यांनी पथकाला बंगल्यात प्रवेश नाकारला, असेही संजय फुंदे यांनी सांगितले.

रेखा यांचा बंगला सील

रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेकडून सील करण्यात आला आहे. वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड परिसरात त्यांचा ‘सी स्प्रिंग’ बंगला आहे. बंगल्याबाहेर नोटीसवर कंटेन्मेंट झोन असा उल्लेख करण्यात आला आहे. (Actress Rekha refuses COVID test)

दुसरीकडे, अमिताभ बच्चन आणि त्यांचे पुत्र-अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांची सून-अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत.

‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे बच्चन कुटुंबाचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. चारही बंगल्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

Aishwarya Rai Corona | बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, ऐश्वर्या-आराध्या यांनाही संसर्ग

(Actress Rekha refuses COVID test)

Published On - 8:04 am, Wed, 15 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI