Actress Rekha Covid Test | ज्येष्ठ अभिनेत्री रेखा ‘कोरोना’ चाचणी करणार

सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेकडून सील करण्यात आला आहे.

Actress Rekha Covid Test | ज्येष्ठ अभिनेत्री रेखा 'कोरोना' चाचणी करणार
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 11:53 AM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि राज्यसभेच्या माजी खासदार रेखा आपली ‘कोरोना’ चाचणी करुन घेणार आहेत. सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने रेखा यांचा बंगला सील करण्यात आला आहे. आता खबरदारीसाठी रेखाही आपली टेस्ट करुन घेणार आहेत. (Veteran Actress Rekha will be taking COVID19 test)

रेखा यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा उल्लेख ‘फिल्मफेअर’ने केला आहे. रेखा यांचा बंगला मुंबई महानगरपालिकेकडून सील करण्यात आला आहे. वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड परिसरात त्यांचा ‘सी स्प्रिंग’ बंगला आहे. बंगल्याबाहेर नोटीसवर कंटेन्मेंट झोन असा उल्लेख करण्यात आला आहे.

दुसरीकडे, बॉलिवूडमध्ये दबदबा असलेल्या बच्चन कुटुंबात कोरोनाने शिरकाव केला आहे. आधी महानायक अमिताभ बच्चन, त्यानंतर त्यांचे पुत्र-अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्यानंतर सून-अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. सुदैवाने बिग बी यांच्या पत्नी आणि खासदार-अभिनेत्री जया बच्चन, त्यांची कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली नंदा, नातू अगस्त्य नंदा यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुंबई महानगरपालिकेने रविवारीच (12 जुलै) ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे बच्चन कुटुंबाचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. चारही बंगल्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. हा संसर्ग आणखी वाढू नये यासाठी कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

सध्या जनक आणि जलसा येथे 28 जणांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर एकूण 56 जणांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांमधील सुमारे 30 कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यापैकी बऱ्याच जणांचे कोरोना अहवाल आज दुपारी येणार आहेत. (Veteran Actress Rekha will be taking COVID19 test)

संबंधित बातम्या :

Aishwarya Rai Corona | बच्चन कुटुंब कोरोनाच्या विळख्यात, ऐश्वर्या-आराध्या यांनाही संसर्ग

Bachchan Family Corona | खासदार जया बच्चन, कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.