VIDEO : रणवीर-दीपिकाचं मुंबईत आगमन, ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन

मुंबई : इटलीत विवाह झाल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण रविवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. रणवीर-दीपिका एअरपोर्टला पोहचताच मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती. लवकरच आता भारतात रिसेप्शन पार्टीचे आयोजनही करण्यात येणार आहे. इटलीतील लेके कोमोच्या काठावरील ‘विला डेल बालबीअॅनेलो’ या रिसॉर्टमध्ये शाहीविवाह सोहळा पार पडला. 14 नोव्हेंबर रोजी कोंकणी पद्धतीने तर 15 […]

VIDEO : रणवीर-दीपिकाचं मुंबईत आगमन, ग्रॅंड रिसेप्शनचं आयोजन
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : इटलीत विवाह झाल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण रविवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. रणवीर-दीपिका एअरपोर्टला पोहचताच मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती. लवकरच आता भारतात रिसेप्शन पार्टीचे आयोजनही करण्यात येणार आहे.

इटलीतील लेके कोमोच्या काठावरील ‘विला डेल बालबीअॅनेलो’ या रिसॉर्टमध्ये शाहीविवाह सोहळा पार पडला. 14 नोव्हेंबर रोजी कोंकणी पद्धतीने तर 15 नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने विवाह करण्यात आला. रणवीर-दीपिकाच्या लग्नात मोजून जवळचे मित्र आणि कुटूंबातील 40 जणांना आमंत्रण देण्यात आले होते.

बॉलीवूडचे ‘बाजीराव मस्तानी’ एअरपोर्टला दाखल होताच थेट आपल्या खारमधील घरात नववधू दीपिकाने गृहप्रवेश केला. यावेळी या नववधू-वर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रणवीरचा गुलाबी रंगाचा जॅकेट तर दीपिकाने लाल रंगाची चुनरी आणि तिच्या सिंदूरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दीपिकाच्या गृह प्रवेशासाठी रणवीरच्या खार येथील घराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. तर काही दिवसांनी हे नव जोडपं वरळीतील नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे बोललं जात आहे.

लग्नानंतर तीन रिसेप्शन पार्ट्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 21 नोव्हेंबरला बंगळुरू येथे, तर 28 नोव्हेंबरला मित्र आणि कुटुंबासाठी, तर 1 डिसेंबर रोजी बॉलीवूडमधील सर्व कलाकारांसाठी ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें