Vikas Dubey Encounter | विकास दुबे पहाटे 6.18 ला पळाला, 6.40 ला खात्मा, 22 मिनिटात काय काय घडलं?

10 ते 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.

Vikas Dubey Encounter | विकास दुबे पहाटे 6.18 ला पळाला, 6.40 ला खात्मा, 22 मिनिटात काय काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 8:55 AM

कानपूर : कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात ज्याचा आठवड्यापासून शोध सुरु होता, त्या कुख्यात गुंड विकास दुबे याचा अटकेनंतर 24 तासात खात्मा झाला. पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्यापासून 22 मिनिटापर्यंत त्याच्या हत्येचा थरार चालला. (Vikas Dubey Encounter Timeline from Arrest to Encounter in Uttar Pradesh)

उज्जैनहून विकास दुबेला घेऊन उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची टीम (एसटीएफ) कानपूरला निघाली होती. यावेळी एसटीएफच्या ताफ्यात स्कॉर्पिओ, सफारी आणि महिंद्र अशी तीन वाहने होती. यापैकी पहाटे सव्वासहाच्या वाजताच्या सुमारास महिंद्र Tuv भौती भागात रस्त्यावर उलटली. यामध्ये एसटीएफचा एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.

अपघाताचा गैरफायदा घेऊन 6 वाजून 18 मिनिटांनी विकास दुबेने पोलिसांच्या बंदुकीसह पळ काढल्याचा दावा पोलिसांनी केला. पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले, मात्र दुबेने पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. साधारण 10 ते 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर विकास दुबे याला काल (9 जुलै) उज्जैन येथून अटक करण्यात आली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

यूपी पोलिसांनी त्याची पत्नी आणि मुलालाही लखनौहून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत विकास दुबे टोळीशी संबंधित पाच गुन्हेगारांना ठार मारले आहे. यूपी पोलिस विकास दुबेचा शोध हरियाणा आणि राजस्थानमध्ये घेत होते, पण तो मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये सापडला.

अटक ते खात्मा – असा आहे घटनाक्रम

गुरुवार 9 जुलै – सकाळी साडेसात वाजता – विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात पोहोचला. त्याने मंदिरात दर्शन घेतले. एका दुकानदाराने विकास दुबे याला ओळखले, त्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांना कळवण्यात आले. यानंतर स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.

सकाळी आठ वाजता – जेव्हा पोलीस मंदिराबाहेर आले, तेव्हा त्यांनी विकास दुबेकडे चौकशी केली, त्याचे ओळखपत्र मागितले. पण तो देऊ शकला नाही. विकास दुबेने पोलिसांशी हुज्जत घातली.

सकाळी साडेआठ वाजता – पोलिसांनी विकास दुबेला पकडले. तेव्हा तो जोरात ओरडत होता की मी विकास दुबे आहे, कानपूरवाला.

गुरुवार 9 जुलै – संध्याकाळी सात वाजता विकास दुबेला मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशला आणण्याची कायदेशीर प्रक्रिया गुरुवारी संध्याकाळी सुरु. यूपी एसटीएफची टीम त्याला घेऊन कानपूरला रवाना.

शुक्रवार 10 जुलै – पहाटे 6.15 वाजताएसटीएफच्या ताफ्यातील महिंद्र Tuv पहाटे सव्वासहा वाजताच्या सुमारास भौती भागात रस्त्यावर उलटली.

पहाटे 6.18 वाजताअपघाताचा गैरफायदा घेऊन 6 वाजून 18 मिनिटांनी विकास दुबेने पोलिसांच्या बंदुकीसह पळ काढल्याचा पोलिसांचा दावा

पहाटे 6.19 वाजता – पोलिसांचे दुबेला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन, मात्र दुबेने पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप

पहाटे 6.20 वाजता –  दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु, 10 ते 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या.

पहाटे 6.40 वाजता – विकास दुबेचा मृत्यू

कोण होता विकास दुबे?

विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास 60 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस कानपूरमध्ये गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या पथकावर त्याच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.

हेही वाचा : हत्येनंतर जाळण्यासाठी घराच्या समोरच 5 पोलिसांचे मृतदेह रचले, चौकशीत गँगस्टर दुबेची कबुली

कानपूरच्या चौबैपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिकरु गावात हा प्रकार घडला. दुबेच्या घराला तटबंदी असून पोलिसांची कोंडी करुन त्यांच्यावर दुबेच्या गुंडांनी हल्ला केला.

विकास दुबे हा अनेक राजकीय पक्षांशी संबंधित होता. त्यामुळे तो आजपर्यंत पकडला गेला नाही. विकास दुबे याने 2001 मध्ये पोलीस ठाण्यात घुसून भाजप नेते आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले संतोष शुक्ला यांची हत्या केली होती. संतोष शुक्ला हत्या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली होती. (Vikas Dubey Encounter Timeline from Arrest to Encounter in Uttar Pradesh)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.