उन्हाने तापलेल्या फरशीवर कपडे काढून बसवलं, चिमुकल्याचा पार्श्वभाग जळाला

उन्हाने तापलेल्या फरशीवर कपडे काढून बसवलं, चिमुकल्याचा पार्श्वभाग जळाला

सात वर्षाच्या चिमुकल्याला कडाक्याच्या उन्हाने तापलेल्या फरशीवर बळजबरीने बसवलं. या धक्कादायक प्रकाराने चिमुकल्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली आहे.

सचिन पाटील

|

Jun 17, 2019 | 10:50 AM

वर्धा : आर्वी इथल्या गुरुनानक धर्मशाळेजळील जोगणामाता मंदिराच्या आवारात धक्कादायक प्रकार घडला आहे. सात वर्षाच्या चिमुकल्याला कडाक्याच्या उन्हाने तापलेल्या फरशीवर बळजबरीने बसवलं. या धक्कादायक प्रकाराने चिमुकल्याच्या पार्श्वभागाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या पार्श्वभागाची चामडी अक्षरश: जळाली आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे उपचार सुरू आहे. चिमुकला दानपेटीतील पैसे चोरत असल्याच्या आरोपावरुन आरोपी अमोल ढोरेने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

आर्वीतील गुरुनानक चौकात जोगणामाता मंदिर आहे. पीडित मुलगा या मंदिराच्या परिसरात शनिवारी दुपारी 11 वाजताच्या सुमारास खेळायला गेला. यावेळी आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे हा सुद्धा मंदिर परिसरात पोहचला. त्यानंतर आरोपीने त्याला विवस्त्र करत फरशीवर बसवले. विना चप्पल जिथे पाय ठेवणे शक्य होत नाही तिथे आरोपी अमोलने पीडित मुलाला विना कपड्याने बसवले. एवढेच नाही तर क्रूर पद्धतीने जबरदस्तीने दाबून धरले. त्यामुळे पीडित मुलाच्या पार्श्वभाग गंभीररित्या भाजला.

या दुखापतीमुळे पीडित मुलगा रडत रडत घरी गेला आणि हा प्रकार घाबरलेल्या अवस्थेत आईला सांगितला. जेव्हा याचा जाब विचारला, त्यावेळी आरोपीने पीडित मुलाच्या आईला चिमुकला चोरी करत असल्याचे सांगितलं. वास्तविक पाहता दानपेटीला यावेळी कुलूप होते. जाब विचारल्यानंतर चूक मान्य न करता आरोपीने शिवीगाळ करत अंगावर धावून गेल्याचा आरोप पीडित मुलाचा आईने केला.

या प्रकरणात युवा स्वाभिमान पक्षाचे दिलीप पोटफोडे यांना माहिती मिळताच त्यांनी पीडित मुलाचा वडिलांसोबत जाऊन आधी जखमी मुलाला रुगणालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे याबाबतीत तक्रार केली. आरोपी उमेश उर्फ अमोलचा दारूचा व्यवसाय आहे. तो याच परिसरात दारूविक्री करत असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे सुद्धा पुढे आले आहे.

याप्रकरणाची गंभीरता पाहून तपास केला जात असून, आरोपीवर शनिवारी उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर रविवारच्या पहाटे अमित ढोरेला अटक करण्यात आलं.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें