सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध, वर्ध्याच्या भाजप खासदाराचा घणाघात

केवळ सत्ता टिकावण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध आहे, अशी घणाघाती टीका वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांनी केलीये.

सत्ता टिकवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध, वर्ध्याच्या भाजप खासदाराचा घणाघात

वर्धा : केवळ महाराष्ट्रात असलेली सत्ता टिकावण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीचा कृषी कायद्याला विरोध करत असल्याची जोरदार टीका वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांनी केली आहे. विरोधासाठी विरोध करायचा म्हणून सेना राष्ट्रवादी या कायद्याला विरोध करत आहे, असं तडस म्हणाले. (Wardha Mp Ramdas Tadas Slam NCp And Shivsena Over Agriculture Act)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. कृषी विधेयकाला काँग्रेसचा विरोध आहे. राज्यातील सत्ता टिकावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनेदेखील या विधेयकाला विरोधाची भूमिका घेतल्याची टीका खासदार रामदास तडस यांनी केलीय. वर्ध्यात खासदार रामदास तडस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी खासदार तडस यांनी विरोधकांवर टीका केली.

“शरद पवार यांनी लोक माझे सांगती या राजकीय आत्मचरित्रत बारामतीतील माल देशात कुठंही विकला जावा अशी सुविधा असावी असं म्हटलं होतं, पण त्यावेळी ते विधेयक पास करू शकले नाही. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्याला त्याचा माल देशात कुठेही विकण्याची सुविधा मिळवून दिली. व्यापाऱ्यांना हमीभावाच्या वरच्या दरानेच कृषी माल खरेदी करावा लागणार आहे”, असं देखील तडस यांनी सांगितलं.

रामदास तडस म्हणाले, “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. कृषी विधेयकाला काँग्रेसचा विरोध आहे. राज्यातील सत्ता टिकावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनेदेखील या विधेयकाला विरोधाची भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतलीये. पण आत्मचरित्रात एक भूमिका आणि आता पवारांनी घेतलेली एक भूमिका यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. ही दुट्टपी भूमिका कशासाठी”, असा सवाल त्यांनी शरद पवारांनी विचारला.

मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचं कृषी विधेयक पारित केलं. त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल देशभरात कुठंही विकता येणार आहे. पण या शेतकरी हिताच्या विधेयकाला विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध चालवला आहे, असं तडस म्हणाले.

(Wardha Mp Ramdas Tadas Slam NCp And Shivsena Over Agriculture Act)

संबंधित बातम्या

Wardha | वर्ध्यात खासदार-शेतकऱ्यांमध्ये वाद, रामदास तडस यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप

दगड मारलाच नाही, शेतकऱ्याचा आरोप खासदार रामदास तडस यांनी फेटाळला, अतिक्रमणावरुन राडा

Published On - 10:48 pm, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI