Weather Alert: ऐन थंडीत मुसळधार पाऊस, गारपीटही! मराठवाड्यावर आणखी किती दिवस अवकाळीचे ढग?

राज्यात विदर्भासह मराठवाड्याला काल अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. मराठवाड्यातील रबी पिकांचंही मोठं नुकसान झालंय. पुढील दोन दिवस असेच हवामान राहिल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Weather Alert: ऐन थंडीत मुसळधार पाऊस, गारपीटही! मराठवाड्यावर आणखी किती दिवस अवकाळीचे ढग?
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 9:24 AM

औरंगाबादः मान्सून काळात मराठवाड्याला मोठ्या अतिवृष्टीचा सामना कराला लागला होता. आता थंडीतही अवकाळी पाऊस मराठवाड्यावर अवकृपा दाखवतोय. राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि पावसाचा (Rain in Marathwada) फटका बसला. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला सध्या अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसतोय. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, पाचोड, गंगापूर, वैजापूर आदी परिसरात वादळी वारा, पाऊस आणि कुठे कुठे तर गारपीटीनेच झोडपलं. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं . जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळीमुळे पिकांना मोठा फटका बसला आहे.

वैजापूर, सिल्लोड, पैठणला मोठा फटका

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील इसारवाडी, धनगाव, वाहेगव, लोहगावमध्ये वादळी वाऱ्यासह 15 ते 20 मिनिटे जोरदार गारपीठ झाली. या भागात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. गंगापूर शहर आणि परिसरात, तसेच वैजापूरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे नव्याने लागवड होत असलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले. तसेच हरभरा, ज्वारीसह रबीच्या पिकांनाही फटका बसला.

मराठवाड्यात आणखी कुठे अवकाळी?

औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात तसेच तीर्थापूरी, वालसावंगी येथे मुसळधार पाऊस पडला. तीर्थापुरी येथे वीजा पडल्यानेही मोठे नुकसान झाले. नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. नांदेड जिल्ह्यात तर दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

आणखी किती दिवस अवकाळीचे सावट?

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ग्रामीण कृषी मौसम केंद्राचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात बऱ्याच वेळा अशी अवकाळी स्थिती निर्माण होते. पण ही स्थिती फार काळ टिकणार नाही. मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस वातावरण असेच राहिल. 28 डिसेंबर रोजी कमाल तापमान 27 अंश सेल्सियस तर किमान तापमान 18 अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले. 29 आणि 30 डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. अशा वातावरणामुळे फळबागांना जास्त फटका बसू शकतो.

इतर बातम्या-

Sahdev Dirdo | ‘बचपन का प्यार’फेम सहदेव दिरदोला भीषण अपघात, डोक्याच्या दुखापतीनंतर बेशुद्धावस्थेत

Vastu tips 2022 | नवीन वर्षात बक्कळ पैसा, स्वप्नपूर्तीच्या शोधात आहात? तर घरातून या तुटलेल्या , फुटलेल्या वस्तू ताबडतोब काढून टाका

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.