AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sahdev Dirdo | ‘बचपन का प्यार’फेम सहदेव दिरदोला भीषण अपघात, डोक्याच्या दुखापतीनंतर बेशुद्धावस्थेत

"जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार मेरा, भूल नहीं जाना रे" या गाण्याने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जुलै महिन्यात अपलोड झालेलं हे गाणं अल्पावधीतच व्हायरल झालं. दहा वर्षांच्या सहदेव दिरदोने अनोख्या स्टाईलमध्ये गायलेलं हे गाणं अनेकांच्या ओठावर रुळलं आहे.

Sahdev Dirdo | 'बचपन का प्यार'फेम सहदेव दिरदोला भीषण अपघात, डोक्याच्या दुखापतीनंतर बेशुद्धावस्थेत
Bachpan Ka Pyaar Fame Sahadev Dirdo
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 8:54 AM
Share

मुंबई : बचपन का प्यार (Bachpan Ka Pyaar) या गाण्यामुळे इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या चिमुरड्या सहदेव दिरदो (Sahdev Dirdo) याला भीषण अपघात झाल्याचं वृत्त मंगळवारी रात्री धडकलं आणि नेटिझन्सच्या काळजाचा ठोका चुकला. बाईकने वडिलांसोबत प्रवास करताना 10 वर्षांच्या सहदेवला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात अपघात झाला. यामध्ये सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कोण आहे सहदेव दिरदो

“जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार मेरा, भूल नहीं जाना रे” या गाण्याने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. जुलै महिन्यात अपलोड झालेलं हे गाणं अल्पावधीतच व्हायरल झालं. दहा वर्षांच्या सहदेव दिरदोने अनोख्या स्टाईलमध्ये गायलेलं हे गाणं अनेकांच्या ओठावर रुळलं आहे. या गाण्याची रॅप व्हर्जनही अनेकांनी केली. सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या सहदेवला अपघात झाल्याच्या वृत्तामुळे अनेकांच्या काळजाला घरं पडली.

रॅपर बादशाहकडून प्रकृतीची माहिती

रॅपर बादशाह याने आपण सहदेवच्या भेटीला जात असल्याचं मंगळवारी रात्री ट्विटरवर सांगितलं. मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात सहदेवच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. “सहदेवच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या सातत्याने संपर्कात आहे. तो बेशुद्धावस्थेत आहे. मी त्याच्या पाठीशी आहेच, तुमच्या प्रार्थनांची मला गरज आहे” असं बादशाहने ट्वीट केलं आहे.

अपघात कसा झाला

सहदेव त्याच्या वडिलांसोबत बाईकवरुन गावी परत येत असताना हा अपघात झाला. बाईकवरुन पडल्यामुळे तो जखमी झाला. सुकमा जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला जगदलपूरमधील मेडिकल कॉलेजमध्ये शिफ्ट करण्यात आले. डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपल्याची माहिती आहे. डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर देखरेख करत आहेत.

संबंधित बातम्या :

तुझं थोडंच आयुष्य उरलंय, जगायचं असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेव, पुण्यातील विवाहितेकडे मागणी, भोंदूबाबाला अटक

दोन ट्रकची समोरासमोर धडक, सायकलस्वाराचा चेंदामेंदा, जळगावात भीषण अपघात

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.