दोन ट्रकची समोरासमोर धडक, सायकलस्वाराचा चेंदामेंदा, जळगावात भीषण अपघात

दोन ट्रकची समोरासमोर धडक, सायकलस्वाराचा चेंदामेंदा, जळगावात भीषण अपघात
जळगावात दोन ट्रकची समोरासमोर धडक

चाळीसगाव-धुळे रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवारी संध्याकाळी सात वाजतच्या सुमारास दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या गवतात आणखी कुणी अडकले आहे का, याचा शोध पोलीस घेत होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 29, 2021 | 7:47 AM

मोतीलाल अहिरे, टीव्ही9 मराठी, चाळीसगाव : दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन ट्रकच्या मध्ये सापडलेल्या सायकलस्वाराचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मंगळवारी संध्याकाळी सात वाजतच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव-धुळे रेल्वे उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला. त्यानंतर जवळपास तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती.

नेमकं काय घडलं?

चाळीसगाव-धुळे रेल्वे उड्डाणपुलाजवळ मंगळवारी संध्याकाळी सात वाजतच्या सुमारास दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या गवतात आणखी कुणी अडकले आहे का, याचा शोध पोलीस घेत होते. अपघातात आणखी काही जण जखमी झाल्याची भीती वर्तवली जात असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस निरीक्षक के के पाटील स्वतः आपल्या लवाजम्यासह घटनास्थळी तळ ठोकून होते,

ट्रक पुलावर अधांतरी लटकले

धुळ्याकडून चाळीसगावकडे येणारा ट्रक क्र. एम एच 18 -AA 5175 ने समोरुन येणारा ट्रक क्र. एच 18 -BA -2191 याला धडक दिली. दोन्ही ट्रक पुलावर अधांतरी लटकले होते. अपघातात सायकलस्वार सापडल्याने त्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाला, तर अन्य एक जण जखमी आहे. जखमी आणि मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र दोन्ही वाहनांचे चालक अजून सापडलेले नाहीत.

संबंधित बातम्या :

Ahmednagar Crime: वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकला

सहकाऱ्यांच्या जामिनासाठी आला, अन पोलिसांना सापडला, उल्हासनगरच्या चालिया साहेब मंदिरातील चोरीचा उलगडा

हिस्सारमध्ये एकाच दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू, अपघात की हत्या? शोध सुरु

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें