Weather Update : 24 तासांत थंडीचा कडाका वाढणार, ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे.

Weather Update : 24 तासांत थंडीचा कडाका वाढणार, 'या' जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद
प्रातिनिधीक फोटो (PTI25-11-2020_000018B)

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा (Cold) जोर वाढताना दिसत आहे. दिवाळीनंतर गुलाबी थंडीचा अनुभवासोबत तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट (Decrease in temperature) पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. अशात बंगालच्या उपसागरातील बुरेवी वादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतर झाल्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Weather Update Cold will increase in 24 hours lowest temperature recorded in gondiya district)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात सगळ्यात कमी किमान तापमान 10. 5 अंश शेल्सिअस गोंदियात नोंदवण्यात आलं आहे. तर नागपुरात किमान तापमान 12 अंश सेल्शिअसवर पोहोचलं आहे. दरम्यान, बुरेवी चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानावर मोठा परिणाम झाला आहे. या चक्रीवादळाने उत्तरेकडून बाष्प ओढून घेतल्यानं अनेक भागात थंडी वाढली आहे.

मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत थंड वारे वाऱ्यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाल्याचं पाहायला मिळतं. मराठवाड्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत थंडी वाढली आहे. इतकंच नाही तर पुढच्या 24 तासांमध्ये तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशावर घसरला आहे. त्यामुळे पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतही तापमानाचा पारा घसरला आहे. सांताक्रुझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 18.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे मुंबईतील यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान आहे. (Weather Update Cold will increase in 24 hours lowest temperature recorded in gondiya district)

इतर बातम्या – 

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन; स्वेटर्स आणि ब्लँकेटस खरेदी करण्यासाठी दिलजित दोसांझकडून 1 कोटीची देणगी

Dhule | धुळ्यातील तापमानात घट, 2 दिवसांपासून कडाक्याची थंडी

(Weather Update Cold will increase in 24 hours lowest temperature recorded in gondiya district)

Published On - 12:11 pm, Sun, 6 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI