AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना केंद्राचा सुधारित प्रस्ताव, कोणकोणत्या मागण्यांवर सहमती?

शेतकऱ्यांच्या काही मागण्यांवर केंद्राने सहमती दर्शवली, तर किमान हमीभावावर शेतकऱ्यांचा संभ्रम दूर केला

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना केंद्राचा सुधारित प्रस्ताव, कोणकोणत्या मागण्यांवर सहमती?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 09, 2020 | 11:43 AM
Share

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज (9 डिसेंबर) 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये अनेक बैठका झाल्या, मात्र त्यातून ठोस तोडगा निघाला नाही. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार सुधारित प्रस्ताव पाठवत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या काही मागण्यांवर केंद्राने सहमती दर्शवली आहे. तर किमान आधारभूत मूल्य किंवा हमीभाव (MSP) यासारख्या बाबींवर सरकारने शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. (What is in center government draft to be send to protesting farmers over agriculture laws)

आंदोलक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सुधारित प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकरीही सिंघू बॉर्डरवरील आंदोलन स्थळी या प्रस्तावावर चर्चा करतील. शेतकऱ्यांनी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदनंतर संध्याकाळी सरकारच्या प्रतिनिधींसोबत त्यांची बैठक झाली होती. यावेळी सरकारने कायदे मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. सुधारित प्रस्तावात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असेल, हे पाहुया

केंद्र सरकारच्या सुधारित प्रस्तावात काय काय?

  1. शेतमालाचे किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) सुरुवातीप्रमाणेच राहील
  2. एमएसपी कायद्या अंतर्गत येणारे बाजार अधिक सशक्त करण्यास सरकार तयार आहे.
  3. शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील वाद उपविभागीय दंडाधिकारी (SDM) कोर्टाऐवजी दिवाणी न्यायालयात सोडवले जावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. याचा सरकारने सुधारित प्रस्तावात समावेश केला आहे.
  4. ज्या व्यापाऱ्यांना खासगी बाजारपेठात व्यापार करण्याची परवानगी मिळेल, त्यांची नोंदणी व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. सद्यस्थितीत केवळ पॅनकार्ड असणे अनिवार्य होते. आता व्यापाऱ्यांची नोंदणी बंधनकारक करण्याचाही प्रस्ताव आहे.
  5. पेंढा (हरियाणवी भाषेत पराली) या मुद्द्यावरही सरकार शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्यास तयार आहे. पेंढा जाळण्याचा पर्याय शेतकऱ्यांसाठी सोयीचा आहे, तर सुप्रीम कोर्टाने पर्यावरणाच्या मुद्द्यावर पराली जाळण्यास मनाई केली आहे.
  6. विजेच्या मुद्यावरही सरकार शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार
  7. याशिवाय कोणत्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना चर्चा करायची असल्यास ती ऐकून घेण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव हन्ना मुल्ला यांनी लेखी मसुद्यावर चर्चेची तयारी दर्शवली आहे

कोणते कृषी कायदे वादग्रस्त?

1 कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020 2 हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020 3 जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020

हमी भावाचा मुद्दा काय?

1) शेतमालाला दिला जावा असा सरकारचा निश्चित दर म्हणजे हमी भाव 2) भाव घसरले तरी सरकार हमी भावानेच खरेदी करणार 3) कृषी मंत्रालय व CACP दरवर्षी हमी भाव ठरवते 4) सध्या 23 पिके, धान्यांचे हमी भाव जाहीर केले जातात 5) तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, भुईमूग, मका, सोयाबीन, तीळ वगैरे मुख्य पिकांचे हमी भाव ठरतात 6) देशभर 6% शेतकऱ्यांनाच हमी भाव मिळतो, पंजाबी शेतकरी अधिक लाभार्थी

शेतकऱ्यांना चिंता कशाची?

1) हमी भाव राहील असे सरकार तोंडी म्हणतंय, त्याची खात्री नाही 2) सरकार हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बंद करेल 3) खाजगी कंपन्या हमी भावाने शेतमाल घेतील याची खात्री नाही 4) कृषी कायद्यांमुळे खाजगी कंपन्यांची खरेदी दरात मनमानी होईल 5) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी यंदापासून राज्यांना बंद 6)  शक्तीशाली कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करतील, फसवतील

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

1) तिन्ही कृषी कायदे मागे घ्या 2) हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी अपराध ठरवा 3) किमान हमी भावाचा कायदा करा 4) 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा 5) सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा 6) कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा 7) राज्यांच्या वैधानिक अधिकारांचा सन्मान करा

सरकारचे म्हणणे काय?

1) तिन्ही कायदे मागे न घेता, त्यात दुरुस्ती करु 2) हमी भावाची कधीच कायद्यात तरतूद नव्हती, आता का करावी? 3) कृषी कायद्यांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील 4) कृषी कायद्यांमुळे खाजगी गुंतवणूक वाढेल 5) शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकता येईल

शेतकरी आंदोलनाची वैशिष्ट्ये

1) 26 नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात आंदोलन 2) आतापर्यंत 18 राजकीय पक्षांचा आंदोलनास पाठिंबा 3) सरकारसोबत आंदोलनापूर्वी 3, आंदोलनापासून पाच बैठका निष्फळ 4) सरकारी वेळकाढूपणाविरोधात देशव्यापी बंदची हाक 5) शेतकऱ्यांना कंपन्यांशी करार करुन कंपन्यास हवे ते पीक व रक्कम मिळेल

कायद्यांविरोधातला युक्तिवाद

1) कृषीबाजार व शेतजमिनीसंबंधी कायदा करण्याचा संसदेस अधिकार आहे का? 2) कृषी कायदे करण्यापूर्वी घटनादुरुस्ती का केली नाही? 3 संघराज्याच्या नावाखाली कृषी या राज्याच्या विषयात केंद्राचा हस्तक्षेप का? 4) तिन्ही कृषी कायद्यांच्या वैधतेला सुप्रीम कोर्टात आव्हान

संबंधित बातम्या

कृषी कायदा, शेतकऱ्यांच्या मागण्या ते सरकारची बाजू, एका क्लिकवर वाचा सगळी माहिती

शरद पवार, राहुल गांधींसह विरोधीपक्षांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

(What is in center government draft to be send to protesting farmers over agriculture laws)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ