WhatsApp मध्ये नवीन अपडेट, ‘हे’ फिचर आता 9 भाषांमध्ये वापरता येणार

गेल्या काही महिन्यांपासून WhatsApp ने नवनवीन फिचर्स आणि अपडेट्सचा सपाटा लावला आहे. आता कंपनीने एक नवीन अपडेट आणलं आहे, ज्यामुळे युजर्सचा चॅटिंग अनुभव अधिक मजेदार होईल.

WhatsApp मध्ये नवीन अपडेट, 'हे' फिचर आता 9 भाषांमध्ये वापरता येणार

मुंबई : WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. संपूर्ण जगात हे अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय होण्यामागे असलेलं प्रमुख कारण म्हणजे या अ‍ॅपचं युजर फ्रेंडली असणं. WhatsApp लाँचिंगपासून युजर्सच्या मागणीनुसार स्वतःला अधिक अद्ययावत करत आलेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तर WhatsApp ने नवनवीन फिचर्स आणि अपडेट्सचा सपाटा लावला आहे. आता कंपनीने एक नवीन अपडेट आणलं आहे, ज्यामुळे युजर्सचा चॅटिंग अनुभव अधिक मजेदार होईल. (Whatsapp Together at Home stickers updated with search option and 9 language support)

व्हॉट्सअ‍ॅप युजर्समध्ये स्टिकर्सचं फिचर खूप लोकप्रिय आहे. चॅटिंग अधिक गंमतीदार बनवण्यासाठी युजर्स याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आता या स्टिकर्समध्ये नवीन अपडेट आलं आहे. नव्या अपडेटनुसार युजर्सना नवीन अॅनिमेटड स्टिकर पॅक मिळेल. तसेच नवीन वॉलपेपरदेखील मिळणार आहेत. तसेच युजर्स ज्या स्टिकर्सची वाट पाहात आहेत (ज्या स्टिकर्सची मागणी होत आहे.), ते स्टिकर्स लवकरच युजर्सना मिळणार आहेत. हे स्टिकर मिळवण्यासाठी युजर्स स्टिकर सर्चचा पर्याय वापरू शकतात.

‘टुगेदर अ‍ॅट होम’ स्टिकर

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी WHO चं टुगेदर अ‍ॅट होम स्टिकर्स अपडेट केले आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, हा स्टिकर पॅक सर्वाधिक लोकप्रिय आहे. तसेच नवीन अपडेटसह यामध्ये अनेक अॅनिमेटेड स्टिकर्स समविष्ट केले जाणार आहेत. यामुळे युजर्सचा चॅटिंग एक्सपिरियन्स अधिक चांगला होईल.

नऊ भाषांमध्ये वापर करता येईल

व्हॉट्सअ‍ॅपचं स्टिकर्स हे फिचर आता नऊ भाषांमध्ये वापरता येईल. यामध्ये अरबी, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, इटालियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश आणि तुर्की भाषेचा समावेश करण्यात आला आहे.

सर्च ऑप्शनचा वापर कसा कराल

युजर्स ज्याप्रकारे इमोजी आणि GIF सर्च करतात, तीच प्रकिया स्टिकर शोधण्यासाठी वापता येईल. इमोजीस पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर खाली इमोजी, जीआयएफ आणि स्टिकर्सचा पर्याय आहे. जीआयएफ पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हवे असलेले स्टिकर्स मिळवता येतील.

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत? मग ही ट्रिक वापरा

WhatsApp चं एक असं फिचर आहे जे काही युजर्सना आवडत नाही अथवा त्यामध्ये नवीन अपडेटची मागणी केली जाते. या फिचरचं नाव आहे डिलीट फॉर एव्हरीवन (Delete for everyone). या फिचरद्वारे कोणताही युजर मेसेज पाठवल्यानंतर तो मेसेज डिलीट करु शकतो. अनेकदा आपण मेसेज वाचण्याआधीच समोरच्या युजरने मेसेज डिलीट केलेला असतो. अशा वेळी त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं, त्या युजरने आपल्याला काय पाठवलं होतं, यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तो मेसेज वाचण्यासाठी आपण उत्सुक असतो. परंतु WhatsApp मध्ये असं कोणतंही फिचर नाही, ज्याद्वारे आपण डिलीट केलेले मेसेज वाचू शकतो. परंतु आम्ही तुम्हाला डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही डिलीट केलेले मेसेज मिळवू शकता.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रिक वापरण्यासाठी तुम्हाला एक थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करावं लागेल. दरम्यान तुम्हाला एक बाब लक्षात ठेवावी लागेल की, WhatsApp अशा कोणत्याही गोष्टीला प्रमोट करत नाही. तसेच या थर्ड पार्टी अ‍ॅपचा तुमच्या प्रायव्हसीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरज असेल तरच तुम्ही या ट्रिकचा वापर करायला हवा.

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज मिळवण्याची ट्रिक

1. डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या अँड्रॉयड फोनवर WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल करावं लागेल. 2. WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन्स अॅक्सेप्ट कराव्या लागतील. 3. अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला फोन नोटिफिकेशनचा अॅक्सेस द्यावा लागेल. 4. त्यानंतर तुम्ही असे अ‍ॅप्स निवडा ज्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायचे आहेत. 5. यामध्ये तुम्हाला WhatsApp मेसेज इनेबल करावं लागेल. त्यानंतर continue बटणावर क्लिक करा. तसेच तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचाही पर्याय दिसेल. तुम्हाला फेसबुक, इन्स्टाग्रामचेही नोटिफिकेशन्स हवे असल्यास तुम्ही त्यांचे पर्याय इनेबल करु शकता. 6. आता तुम्ही थेट अशा पेजवर जाल जिथे तुम्हाला डिलीट केलेले सर्व मेसेज दिसतील.

गुगल प्ले स्टोरवर असे अनेक अ‍ॅप उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील डिलीट केलेले मेसेज वाचू शकता. परंतु हे अॅप्स केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी आहेत, आयओएस युजर्ससाठी कोणतंही अॅप उबलब्ध नाही.

संबंधित बातम्या

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

WhatsApp मध्ये सिक्रेट चॅट करणं सोपं होणार; लवकरच येणार ‘हे’ कमालीचं फिचर

Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा

(Whatsapp Together at Home stickers updated with search option and 9 language support)

Published On - 10:35 am, Thu, 3 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI