‘या’ कारणामुळे विंग कमांडर अभिनंदन यांची बदली

श्रीनगर : बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानी वायूदलाला चोख उत्तर देणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची बदली करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये अभिनंदन यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची बदली श्रीनगर एअरबेसच्या बाहेर करण्यात आली आहे. आता पश्चिम सेक्टरमधील एअरबेसमध्ये ते काम करतील, असं म्हटलं जात आहे. अभिनंदन सर्वात पहिल्यांदा 27 एप्रिलला चर्चेत आले होते. ज्यावेळेस पाकिस्तानचे लढाऊ […]

'या' कारणामुळे विंग कमांडर अभिनंदन यांची बदली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

श्रीनगर : बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानी वायूदलाला चोख उत्तर देणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची बदली करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये अभिनंदन यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची बदली श्रीनगर एअरबेसच्या बाहेर करण्यात आली आहे. आता पश्चिम सेक्टरमधील एअरबेसमध्ये ते काम करतील, असं म्हटलं जात आहे.

अभिनंदन सर्वात पहिल्यांदा 27 एप्रिलला चर्चेत आले होते. ज्यावेळेस पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-16 ने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांना रोखण्यासाठी भारतीय वायूसनेने प्रतिउत्तर दिले होते. भारतीय वायूसनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी एफ-16 या विमानाला मिग विमानाच्या सहाय्याने पाडले होते. यावेळी अभिनंदन यांचे विमानही कोसळले आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत पडले आणि त्यांना अटक करण्यात आली होती.

भारताच्या जवानाला पाकिस्तानमध्ये अटक झाल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. यावेळी भारत सरकारवरही मोठ्या प्रमाणात जनतेकडून दबाव टाकण्यात आला होता. भारत सरकारनेही पाकिस्तानवर दबाव टाकत अभिनंदन यांना सोडण्यासाठी मजबूर केले. पाकिस्ताननेही साठ तासानंतर अभिनंदन यांना सोडले.

पाकिस्तानच्या हद्दीत अभिनंदन फसल्यानंतर त्यांना तेथील स्थानिक रहिवाशांकडून मारहाणही झाली होती. पण वेळीच पाकिस्तान सैन्याने अभिनंदन यांना अटक केले. यावेळी पाकिस्तान सैन्याला विंग कमांडर यांनी रोखठोक अशी उत्तर दिली होती हे पाहून भारतीयांनाही गर्व वाटत होता.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.