कॉर्नर सीटवर पतीला गर्लफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडलं, पत्नी झाली ‘मर्दानी’

महिलेने पतीला सीटवरुन खेचत आणलं आणि सर्वांसमोर त्याची दे दणादण धुलाई केली. नवऱ्याची प्रेयसीही मध्ये पडली, तेव्हा तिलाही महिलेने 'प्रसाद' दिला

कॉर्नर सीटवर पतीला गर्लफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडलं, पत्नी झाली 'मर्दानी'

अहमदाबाद : चित्रपटगृहातील कॉर्नर सीटवर बसून गर्लफ्रेण्डसोबत रोमान्स करणाऱ्या पतीला महिलेने रंगेहाथ पकडलं. अहमदाबादमध्ये प्रेयसीसोबत ‘मर्दानी 2’ पाहणाऱ्या पतीला पत्नीनेच ‘मर्दानी’ बनून यथेच्छ चोप (Woman caught Husband with GF) दिला.

रिकाम्या थिएटरमध्ये कोपऱ्यातील जागा पकडून रोमान्स करणाऱ्या जोडप्यांची संख्या कमी नाही. मात्र समाजापासून लपतछपत प्रेयसीसोबत सिनेमागृहात आलेला नवरा, बायकोपासून लपू शकला नाही. गुजरातमधील अहमदाबादमध्ये ‘मर्दानी 2’ पाहण्यासाठी थिएटरला आलेल्या प्रेक्षकांना पडद्यावरील नाट्य पाहावं, की पडद्यासमोर घडणारं, हा प्रश्न पडला असावा.

तुझा नवरा त्याच्या प्रेयसीसोबत सिनेमा पाहायला जाणार आहे, असा निरोप संबंधित महिलेला तिच्या मैत्रिणीने दिला. त्यामुळे वैतागलेली पत्नी दात-ओठ खात थेट चित्रपटगृहात जाऊन पोहचली. सिनेमागृहात ‘मर्दानी 2’ चित्रपट सुरु होता.

पत्नीवर मित्रांकरवी बलात्कार, वाईफ स्वॅपिंग प्रकरणात मुंबईत उद्योगपतीला अटक

पत्नीने काळोखातच थोडी शोधाशोध केली, तेव्हा आपला नवरा एका तरुणीसोबत रोमान्स करत कॉर्नर सीटवर बसल्याचं तिला आढळला. पडद्यावर अभिनेत्री राणी मुखर्जीची धडाकेबाज ‘मर्दानी’ व्यक्तिरेखा पाहून महिलेच्या अंगातही ‘मर्दानी 2’ संचारली.

महिलेने पतीला सीटवरुन खेचत आणलं आणि सर्वांसमोर त्याची दे दणादण धुलाई केली. नवऱ्याची प्रेयसीही मध्ये पडली, तेव्हा तिलाही महिलेने ‘प्रसाद’ दिला. त्यानंतर महिलेने पोलिसांना बोलावलं. तेव्हा नवरंगपुरा पोलिसांनी कशीबशी समजूत काढत तिघांना घरी (Woman caught Husband with GF) पाठवलं.

Published On - 11:19 am, Sat, 28 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI