क्षुल्लक कारणावरुन सासूची गळा आवळून हत्या, गोंदियातील धक्कादायक घटना

गोंदियात एका महिलेने आपल्या 68 वर्षीय सासूची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे (Woman Murdered her Mother in Law).

क्षुल्लक कारणावरुन सासूची गळा आवळून हत्या, गोंदियातील धक्कादायक घटना

गोंदिया : आमगाव पोलीस ठाण्याअंतर्गत तिगावात एका महिलेने आपल्या 68 वर्षीय सासूची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे (Woman Murdered her Mother in Law).

आरोपी डिलेश्वरी बारेवार (वय – 23 वर्ष) या महिलेने आपल्या 68 वर्षीय सासू तिरणाबाई यांची 23 ऑक्टोबर रोजी रात्री गळा आवळून हत्या केली. मात्र, ही बाब रात्रीच्या वेळी उघडकीस आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिरणाबाई यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी नदीवर घेऊन जात असताना ही बाब उघडकीस आली (Woman Murdered her Mother in Law).

तिरणाबाई यांचे नातेवाईक त्यांच्या पार्थिवाची आंघोळ घालत असताना त्यांच्या गळ्यावर वळ उमटलेले दिसले. त्यामुळे तिरणाबाई यांची गळा आवळून हत्या करण्यात आली, हे त्यांच्या मुलीच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तातडीने आमगाव पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी तातडीने आपली कारवाई सुरु केली. त्याचबरोबर मृतदेहाचं आज शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी सूनेची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान सूनेने आपला गुन्हा मान्य केला. सुनेच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.

संबंधित बातम्या

“ओळखलं नाही का? मी नगरसेवकाचा भाऊ” दागिने-पैसे लुटणारा वसईचा भामटा अटकेत

भिकारी महिलेच्या झोपडीत 10 महागडे मोबाईल, पोलीसही अवाक

Published On - 10:40 pm, Sun, 25 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI