Lockdown : महिला अत्याचारांमध्ये वाढ, आरआरएसकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन नंबर जारी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (women domestic violence during lockdown) आहे.

Lockdown : महिला अत्याचारांमध्ये वाढ, आरआरएसकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन नंबर जारी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (women domestic violence during lockdown) आहे. या दरम्यान अनेक कुटुंबात कौटुंबिक वाद होत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. त्यामुळे या पीडित महिलांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ज्या महिलांवर अत्याचार होत आहे त्यांनी थेट या नंबर कॉल करावा. जेणेकरुन या महिलांच्या समस्या सोडवल्या जाणार आहेत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला कार्यकर्त्यांनी (women domestic violence during lockdown) सांगितले.

लॉकडाऊन दरम्यान महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये इतर दिवसांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. जम्मू-काश्मिरच्या हाय कोर्टातील न्यायाधीश गीता मित्तल आणि राजेश ओसवाल यांनी लॉकडाऊन दरम्यान महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेतली आहे.

या दरम्यान सोशल मीडियावरही अनेक कौटुंबिक हिसांचाराचे लेख प्रसिद्ध केले जात आहेत. महिलांच्या अत्याचारात वाढ झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील महिला कार्यकर्त्यांनीही यावर चिंता व्यक्त करत हेल्प लाईन नंबर जारी केला.

महिलांवर अत्याचार वाढल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक हेल्प लाईन नंबर जारी केला आहे. या हेल्प लाईनद्वारे दिल्लीच्या महिला अधिवक्ता, डॉक्टर, उद्योजक, प्रोफेसर, सामाजिक कार्यकर्ता आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिला पीडित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करणार आहेत. या सर्व महिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत.

या हेल्पलाईनद्वारे प्रत्येक महिलेच्या समस्येची दखल घेतली जाईल आणि टेलिफोनच्या माध्यमातून त्यांची काऊन्सलिंग केली जाईल. लॉकडाऊन दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला कार्यकर्त्या पीडित महिलांच्या समस्या सोडवतली.

या हेल्पलाईनसाठी 817-817-1234 हा नंबर जारी करण्यात आला आहे. या नंबरवर पीडित महिला कॉलकरुन आपल्या समस्या मांडू शकतात. कौटुंबिक हिंसाचार, वाद, पतीकडून मारहाण आणि इतर सर्व प्रकारच्या घटनेसाठी महिला या नंबरवर कॉल करुन सांगू शकतात.

“आज संपूर्ण देश कोरोना विरुद्ध लढत आहे. तर यावेळी आपण घरातील महिलांचा सन्मान केला पाहिजे. कारण समाजात एक चांगला संदेश जाईल. संघाकडून जो हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. या माध्यमातून सर्व पीडित मिहला कॉलकरुन आपल्या सर्व समस्या मांडू शकतात”, असं संघाशी संबंधित वकील प्रतिमा लाकडा यांनी सांगितले.


Published On - 8:10 pm, Sun, 26 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI