AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसई-विरारकरांसाठी ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ योजना, आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुढाकार

बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी वसई विरारकरांसाठी ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ ही संकल्पना आणली आहे. (Work from my office scheme for Vasai-Virarkar of MLA Kshitij Thakur)

वसई-विरारकरांसाठी 'वर्क फ्रॉम माय ऑफिस' योजना, आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुढाकार
| Updated on: Sep 24, 2020 | 9:26 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सवलत दिली आहे. पण त्यामुळे घराचं घरपण मागे पडत चालल्याच्या तक्रारी आहेत. याचा विचार करून आता बहुजन विकास आघाडीने ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ ही संकल्पना आणली आहे. या संकल्पनेअंतर्गत जुनं विवा महाविद्यालय, नवीन विवा महाविद्यालय आणि नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडी भवन या तीन इमारतींमध्ये ऑफिससारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. लोक इथे जाऊन काम करू शकतात. आमदार क्षितीज ठाकूर यांच्या पुढाकारातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. (Work from my office scheme for Vasai-Virarkar of MLA Kshitij Thakur)

मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करण्याची सुविधा दिली. सुरुवातीला खूप सोयीच्या वाटणाऱ्या या सुविधेचे वेगळे परिणाम आता दिसू लागले आहेत. घरातून काम करताना अनेकदा कुटुंबासाठी असणारा वेळही कामासाठी द्यावा लागत असल्याने कौटुंबिक समस्यांमध्येही वाढ झाली आहे. त्याशिवाय घरातील इतर व्यक्तिंना मोकळेपणे वावरण्यावर निर्बंध आल्यासारखं होत आहे.

या सगळ्या गोष्टींमुळे कौटुंबिक कलह आणि ताणतणाव या समस्या वाढल्या आहेत. या बाबी लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली बहुजन विकास आघाडीने ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ ही संकल्पना आणली आहे. या संकल्पनेअंतर्गत जुने आणि नवीन विवा महाविद्यालयाच्या इमारती आणि नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडी भवनची इमारत इथे ऑफिससारखी सोय करून देण्यात येणार आहे.

वसई-विरार पट्ट्यात राहणाऱ्या आणि घरून काम करणाऱ्यांना या तीनही ठिकाणी ऑफिससारखं वातावरण मिळेल. इथे टेबल-खुर्चीबरोबरच गरज पडल्यास कम्प्युटरची व्यवस्था केली जाईल. त्याशिवाय वायफाय सेवा पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत उपलब्ध असेल. नेहमीच्या ऑफिसच्या वेळेत ही सेवा लोकांसाठी उपलब्ध असेल. लोक त्यांच्या वेळेत येऊन इथे बसून काम करू शकतील.

एखाद्या पक्षाचं कार्यालय असलेली इमारत सर्वसामान्यांचं ऑफिस म्हणून वापरण्याचा हा पहिलाच प्रकार असेल. सध्याची परिस्थिती पाहता लोकांना सर्व प्रकारे दिलासा देणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं आणि लोकांचा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीचं काम आहे, असं आमदार क्षितीज ठाकूर यांनी सांगितलं.

गेल्या पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ लोक घरातून काम करत आहेत. त्यामुळे घराचं घरपण गेलं असलं, तरी घरातून धड ऑफिससारखं काम करणंही शक्य नाही. ऑफिसमध्ये बसून काम करणं ही वेगळी गोष्ट असते. काम वेळेत आणि व्यवस्थित पार पडतं. त्यामुळेच आम्ही ही संकल्पना राबवत आहोत. यामुळे तरी घराचं घरपण परत येईल, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.

या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना एका लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे. इंटरनेट कनेक्शनसोबत या ठिकाणी वीज, टेबल, खुर्च्या, पाणी आणि गरज पडल्यास खासगी कम्प्युटरही पुरवला जाईल. तसंच कोरोना काळात या अशा ठिकाणी काम करणं सुरक्षित वाटावं, यासाठी इथे येणाऱ्या प्रत्येकाचं तापमान आणि ऑक्सिजनची पातळी मोजली जाईल. त्याशिवाय सॅनिटायझर, मास्क आदी गोष्टी अनिवार्य असतील.

संबंधित बातम्या :

पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या दरात विकणाऱ्यांचा भांडाफोड, आरोपींमध्ये एका वॉर्डबॉयचा समावेश

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेले ‘जम्बो’ कोव्हिड सेंटर ‘कुपोषित’, ICU बेड्सची वानवा, व्हेंटिलेटर्स धूळखात

(Work from My office scheme for Vasai-Virarkar of MLA Kshitij Thakur)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.