स्ट्रॉबेरी उत्पादकाचा मुलगा ते जपानचे नवे पंतप्रधान, ‘हे’ आहेत शिंजो आबे यांचे उत्तराधिकारी

शिंजो आबे यांचे मुख्य कॅबिनेट सचिव योशीहिदे सुगा यांनी जपानचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.

स्ट्रॉबेरी उत्पादकाचा मुलगा ते जपानचे नवे पंतप्रधान, 'हे' आहेत शिंजो आबे यांचे उत्तराधिकारी

टोक्यो : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्याने बुधवारी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा कार्यभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला. आबे यांचे मुख्य कॅबिनेट सचिव योशीहिदे सुगा यांनी जपानचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. स्ट्रॉबेरी उत्पादकाचा मुलगा ते जपानचे नवे पंतप्रधान हा सुगा यांच्या प्रवास निश्चितच सोपा नाही. (Yoshihide Suga formally takes charge as Japan’ PM after Shinzo Abe‘s resignation)

शिंजो आबे यांचा ‘उजवा हात’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या योशीहिदे सुगा यांना सोमवारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे संसदीय नेते म्हणून निवडण्यात आले. पक्षाला संसदेत असलेल्या बहुमतामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीचा मार्ग सुकर होता. त्यांनी बुधवारी जपानचे पंतप्रधान म्हणून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

स्ट्रॉबेरी उत्पादकाचा मुलगा

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना योशीहिदे सुगा यांनी पक्षात स्वत:चे स्थान निर्माण केले. पक्षातील दिग्गज नेत्यांचे समर्थन मिळवण्यात ते यशस्वी झाले. आकिताच्या उत्तर प्रांतातील स्ट्रॉबेरी उत्पादकाचा मुलगा ही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. त्यामुळेच नवी जबाबदारी पेलताना सामान्य नागरिक आणि ग्रामीण भागातील जनतेचे हित साधण्याचे वचन देण्यावर त्यांनी जोर दिला आहे.

जपानचे मावळते पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रकल्प आणि धोरणांचा आपण पाठपुरावा करु, कोरोना व्हायरसशी लढा देण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊ, तसेच कोरोनाचा फटका बसलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी दिले.

आबे यांचा निष्ठावंत समर्थक

2006 मध्ये आबे यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळात सुगा हे त्यांचे निष्ठावंत समर्थक राहिले. आबे यांचा कार्यकाळ आजारपणामुळे अचानक संपण्याच्या मार्गावर असताना सुगा यांनी 2012 मध्ये आबे यांना पंतप्रधानपदावर परत येण्यास मदत केली.

(Yoshihide Suga formally takes charge as Japan’ PM after Shinzo Abe‘s resignation)

सुगा यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अर्थमंत्री तारो आसो, परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि ऑलिम्पिक मंत्री सेको हाशिमोतो यांची पदं अबाधित राहण्याचा अंदाज आहे.

शिंजो आबे पायउतार

शिंजो आबे यांनी वैद्यकीय कारणास्तव जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचा निर्णय 28 ऑगस्टला जाहीर केला होता. त्यावेळी विनम्रपणे झुकून त्यांनी जपानी जनतेची माफी मागितली होती. 65 वर्षीय शिंजो आबे गेल्या अनेक वर्षांपासून ‘अल्सरेटिव्ह कोलायटीस’ या आतड्यांसंबंधी आजाराने त्रस्त आहेत.

शिंजो आबे गेल्या वर्षीच सर्वात दीर्घ काळासाठी जपानचे पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरले होते. त्यांचा सध्याचा कार्यकाळ 2012 मध्ये सुरु झाला. म्हणजेच गेली आठ वर्ष त्यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली.

संबंधित बातम्या :

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पदावरुन पायउतार, विनम्रपणे झुकून जनतेची माफी

(Yoshihide Suga formally takes charge as Japan’ PM after Shinzo Abe‘s resignation)

Published On - 11:07 am, Wed, 16 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI