AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Travel | ‘बंजी जंपिंग’ करायचीय? मग ‘या’ 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!

सुट्टीच्या वेळी काही लोकांना शांत ठिकाणी जाऊन आराम कारणं आवडतं. तर, काही लोकांना मात्र साहसी खेळात सहभागी होण्याची इच्छा असते. या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये 'बंजी जंपिंग'चे नाव अगदी पहिल्या क्रमांकावर आहे.

Travel | 'बंजी जंपिंग' करायचीय? मग 'या' 5 ठिकाणांना नक्की भेट द्या!
अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये 'बंजी जंपिंग'चे नाव अगदी पहिल्या क्रमांकावर आहे.
| Updated on: Jan 28, 2021 | 6:02 PM
Share

मुंबई : कोरोनाची भीती अद्याप तशीच आहे. मात्र, या परिस्थितीतही शक्य ती सर्व काळजी घेत सध्या बरेच लोक मोकळ्या वातावरणात फिरण्यासाठी बाहेर पडत आहे. अशावेळी काही लोकांना शांत ठिकाणी जाऊन आराम कारणं आवडतं. तर, काही लोकांना मात्र साहसी खेळात सहभागी होण्याची इच्छा असते. या अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये ‘बंजी जंपिंग’चे नाव अगदी पहिल्या क्रमांकावर आहे. तुम्हालाही बंजी जंपिंग आवडत असेल किंवा पहिल्यांदाच ट्राय करायचा विचार करत असाल,तर आम्ही तुम्हाला अशीच काही ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्ही बंजी जंपिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकाल (5 best places for bungee jumping).

हृषिकेश

उत्तराखंडमध्ये हृषिकेशच्या मोहन चट्टीमध्ये एक बंजी जंपिंग स्पॉट आहे. या ठिकाणी बंजी जंपिंगसाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, जे जमिनीपासून 83 मीटर उंच आहेत. येथे बंजी जंपिंगचे भाडे सुमारे 3550 इतके रुपये आहे. परंतु, लॉकडाऊननंतर या भाडे दरात बदल होऊ शकतो. आपण तेथे जाऊन बार्गेनिंग देखील करू शकता.

जगदलपूर

छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये असलेला बंजी जंपिंग स्पॉट अ‍ॅडव्हेंचर प्रेमींसाठी एक चांगले ठिकाण आहे. जर आपल्याला जास्त उंचीवरून बंजी जंपिंग करण्याची इच्छा नसेल, तर हे ठिकाण योग्य आहे. कारण याची उंची फक्त जमिनीपासून केवळ 30 मीटर आहे. तसेच इथे बंजी जंपिंग करण्यासाठी खर्चही फारसा येत नाही. यासाठी आपल्याला प्रति व्यक्ती केवळ 300 रुपये इतकीच रक्कम मोजावी लागते.

गोवा

जर तुम्हाला बंजी जंपिंगची आवड असेल तर ग्रॅविटी झोनमध्ये एकदा तरी उडी मारण्याचा आनंद नक्की घ्यावा. गोव्याच्या अंजुना बीचवर आपल्याला हे ठिकाण सहज सापडेल. आपण येथे 25 मीटरच्या शिखरावरुन उडी मारू शकता. यासाठी आपल्याला केवळ 500 रुपये इतकीच किंमत मोजावी लागेल (5 best places for bungee jumping).

लोणावळा

लोणावळा हे एक सुंदर हिल स्टेशन आहे, जे पुण्याच्या हद्दीत वसलेले आहे. लोणावळा हे बंजी जंपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. हा भारतातील एक उत्कृष्ट आणि अतिशय सुरक्षित बंजी जंपिंग स्पॉट आहे. मुंबई व पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी हे सर्वात जवळचे ठिकाण आहे. येथे बंजी जंपिंगचा आनंद लुटण्यासाठी 1500 ते 2000 रुपये मोजावे लागतात.

बेंगळुरू

बेंगळुरूमधील सर्वात रोमांचक खेळांपैकी एक खेळ म्हणजे बंजी जंपिंग. अशा साहसी क्रियाकलाप येथील कांतीरवा स्टेडियममध्ये होतात. जिथे उपकरणांना क्रेनच्या सहाय्याने 130 फूट उंचीवर ठेवले जाते. तर उडीची मारण्यासाठी 80 फूट खोल जागा ठेवण्यात आली आहे. येथे जंपिंगचा आनंद घेण्यासाठी आपल्याला फक्त 400 रुपये खर्च करावे लागतील.

(टीपः बंजी जंपिंगसाठी असलेले भाड्याचे दर बदलू शकतात. याशिवाय तुम्ही तेथे जाऊन हे दर सुनिश्चित करू शकता.)

(5 best places for bungee jumping)

हेही वाचा :

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.