Beauty Hacks: रिमूव्हरशिवाय नेलपॉलिश काढण्यासाठी ‘हे’ आहेत 5 प्रभावी हॅक्स
नेलपॉलिश रिमूव्हर संपले तर नखांवरून नेल पेंट साफ करणे खूप त्रासदायक वाटते. पण आता अशा अनेक गोष्टी आहेत ज्या क्षणार्धात नेल पेंट काढून टाकतील. चला तर मग आजच्या लेखात आपण नेलपॉलिश काढण्यासाठी 5 प्रभावी हॅक्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात...

नेलपॉलिश लावल्याने हातांचे सौंदर्य अनेक पटीने वाढते. बहुतेक मुलींना ट्रेंड किंवा कार्यक्रमानुसार नेलपॉलिश लावायला आवडते आणि त्यामुळे बऱ्याचदा आधी लावलेली नेलपेंट नखांवरून काढावे लागते. पण अशातच नेलपेंट काढणे कधीकधी त्रासदायक ठरू शकते. जेव्हा नेलपॉलिश रिमूव्हर संपलेला असतो तेव्हा आपण विविध पद्धतीने नखांवरील नेलपेंट काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण तुमच्या घरातच काही गोष्टी आहेत, ज्या वापरून तुम्ही नेलपॉलिश सहजपणे काढू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊया.
सौंदर्य आणि मेकअपशी संबंधित अनेक DIY हॅक्स आहेत जे शेवटच्या क्षणी येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी आहेत. बऱ्याचदा यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. चला तर मग जाणून घेऊया जर तुम्हाला रिमूव्हर मिळाला नाही तर नेल पेंट कशी काढायची.
हँड सॅनिटायझरचे आश्चर्यकारक परिणाम
बहुतेक घरांमध्ये आता हँड सॅनिटायझर असतेच, तर हेच हँड सॅनिटायझर तुमच्यासाठी नेल पेंट रिमूव्हर म्हणून देखील काम करेल, कारण त्यात अल्कोहोल असते. कापसाच्या बॉलवर थोडेसे सॅनिटायझर लावा आणि ते नखांवर हलक्या हाताने घासून घ्या आणि थोड्याच वेळात नेलपॉलिश निघून जाईल.
नेलपॉलिश देखील आहे रिमूव्हर
नेलपॉलिश देखील रिमूव्हरसाठी उत्तम काम करते. हो हे जरी थोडे विचित्र वाटत असले तरी, हे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. नेलपेंट काढण्यासाठी त्यावर नेलपॉलिशचा जाड थर लावा आणि नंतर लगेच कापसाने स्वच्छ करा. असे दोनदा केल्याने, जुना नेलपेंट पूर्णपणे निघून जाईल.
परफ्यूम वापरा
नेलपॉलिश साफ करण्यासाठी देखील परफ्यूमचा वापर केला जाऊ शकतो, परंतु परफ्यूम हे अल्कोहोल आधारित असावे. कापसावर परफ्यूम स्प्रे करा आणि नंतर नेलपॉलिश काढण्यासाठी गोलाकार हालचालीत नखांवर हलक्या हाताने घासून नेलपेंट रिमूव्हर करा.
हेअर स्प्रे तुमच्यासाठी काम करेल
तुम्ही जर केसांना सेट करण्यासाठी हेअर स्प्रे वापरत असाल तर लक्षात ठेवा की त्यात असलेले रसायने नेलपॉलिश काढण्यास देखील मदत करू शकतात. यामध्ये देखील तुम्हाला हीच प्रक्रिया अवलंबावी लागेल. कापसावर हेअर स्प्रे लावा आणि नखांवर घासून घ्या. यासाठी थोडा वेळ लागेल.
लिंबू आणि व्हिनेगर
नेलपेंट काढण्यासाठी घरगुती उपायांबद्दल बोलायचे झाले तर, एक चमचा लिंबाचा रस घ्या आणि त्यात तेवढेच व्हिनेगर मिक्स करा. आता हे मिश्रण कापसावर घेऊन नखांवर घासून घ्या. ही प्रक्रिया देखील रसायनमुक्त आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
