AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतत एसी आणि कुलरच्या वापराने त्वचेशी संबंधित ‘या’ समस्या उद्भवू शकतात

उन्हाळ्यात एसी आणि कूलरशिवाय जगणे कठीण होते. म्हणूनच लोक दिवसभर ऑफिस आणि घरात एसी चालू ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का दिवसभर एसीमध्ये राहणे तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या त्वचेसाठी किती हानिकारक आहे. एसी आणि कूलरसमोर बसल्याने तुम्हाला कोणत्या त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात.

सतत एसी आणि कुलरच्या वापराने त्वचेशी संबंधित 'या' समस्या उद्भवू शकतात
ACImage Credit source: Philippe TURPIN/Getty images
| Edited By: | Updated on: May 06, 2025 | 1:23 AM
Share

प्रखर उन्हाळ्यामुळे प्रत्येकजण त्रस्त होत असतात. तसेच कडक उन्हामुळे लोकांचे हाल होतात. जर पंख्याने या उष्णतेपासून आराम मिळत नसेल, तर प्रत्येक घरात, ऑफिसमध्ये, तसेच मेट्रोमध्ये देखील सर्वत्र एसी बसवले आहेत आणि लोकांना एसीमध्ये राहण्याची इतकी सवय झाली आहे की त्याशिवाय राहणे कठीण होते, पण तुम्हाला माहिती आहे का की एसी आणि कूलरची ही सवय तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या त्वचेला आणि डोळ्यांनाही नुकसान पोहोचवते.

कडक उन्हात कूलर किंवा एसीसमोर बसल्याने आराम मिळतो. हेच कारण आहे की लोक दिवसभर त्यांच्या घरात आणि ऑफिसमध्ये एसी चालू ठेवतात. त्याची थंड हवा उष्णतेपासून आराम देते पण तुम्हाला माहिती आहे का एसीची ही थंड हवा तुमच्या त्वचेला कशी नुकसान पोहोचवते. एसीसमोर बसल्याने तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणत्या समस्या उद्भवू शकतात आणि त्या कशा टाळायच्या ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात…

एसीमुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या

कोरडी आणि निस्तेज त्वचा

उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जाणवत असते आणि जर तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसलात तर एसी तुमच्या त्वचेची आर्द्रता कमी करू शकते आणि त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्वचेची चमकही कमी होऊ लागते आणि त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. या कारणास्तव, एसी आणि कूलरसमोर जास्त वेळ बसल्याने तुमच्या शरीरावर आणि त्वचेवर वाईट परिणाम होतो.

त्वचेची अ‍ॅलर्जी ही एक समस्या

दिवसभर एसीसमोर बसल्याने त्वचेची अ‍ॅलर्जी आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एसीमधून येणाऱ्या कोरड्या हवेत जास्त वेळ राहिल्याने एक्झिमा, सोरायसिस सारख्या त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

डोळ्यांत कोरडेपणा

जास्त वेळ एसीमध्ये राहिल्याने त्वचेचा कोरडेपणा तर वाढतोच पण डोळ्यांनाही याचा त्रास होतो. यामुळे तुमच्या डोळ्यांत कोरडेपणा जाणवू शकतो, ज्यामुळे खाज सुटणे, लालसरपणा आणि सूज वाढू शकते.

एसी आणि कूलरमुळे होणाऱ्या त्वचेच्या समस्या कशा टाळाव्यात

चेहऱ्यावर फेस मिस्ट किंवा टोनर वापरा

उन्हाळ्यात तुमचा चेहरा हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही मिस्ट किंवा टोनर वापरू शकता. चेहऱ्यावर लावण्यासाठी, ग्लिसरीन आणि गुलाबजल असलेले स्प्रे निवडा. हे तुमच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवेल.

बॉडी लोशन वापरा

तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझ करण्यासोबतच, तुमच्या हातांना, पायांना, मानेलाही बॉडी लोशन लावा, यामुळे तुमच्या त्वचेला ओलावा कमी होणार नाही.

गरज असेल तेव्हाच एसी चालवा

दिवसभर एसी आणि कूलरमध्ये राहण्याऐवजी, गरज असेल तेव्हाच या गोष्टी वापरा. यामुळे तुमची त्वचा आणि तुमचे शरीर निरोगी राहील.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.