AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नैसर्गिक चमक, त्वचा घट्ट आणि त्वचेच्या इतर फायद्यांसाठी चेहऱ्याला लावा शेवग्याच्‍या पानांचा फेस पॅक

तुमच्या चेहऱ्यावर निस्तेजपणा, काळे डाग आणि बारीक रेषा दिसत असतील, तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानापासून बनवलेला फेसपॅक खूप प्रभावी ठरू शकते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात शेवग्याच्या पानांचा फेस पॅक कसा बनवायचा?

नैसर्गिक चमक, त्वचा घट्ट आणि त्वचेच्या इतर फायद्यांसाठी चेहऱ्याला लावा शेवग्याच्‍या पानांचा फेस पॅक
Moringa Leaves
| Edited By: | Updated on: May 12, 2026 | 4:02 PM
Share

शेवगा पोषक तत्वांचा खजिना आहे. तसेच आयुर्वेदात शेवग्याला एक शक्तीशाली सुपरफुड मानला जातो. कारण शेवग्याच्या शेंगा आणि पानं ही गुणधर्मांनी समृद्ध आहे, म्हणूनच त्याचा वापर खाद्यपदार्थ आणि ब्युटी प्रोडक्ट बनवताना दोन्हींमध्ये केला जातो. अशातच त्वचेच्या समस्यांवर उपाय म्हणून महागड्या, केमिकलयुक्त क्रीम्स वापरून तुम्ही थकला असाल, तर काही दिवस शेवग्याचा पानांपासून बनवलेला हा फेस पॅक लावून पाहा. यामुळे तुमच्या त्वचेतील कोलेजन वाढण्यास मदत होईल आणि बारीक रेषा, निस्तेजपणा व सुरकुत्या देखील कमी होतील.

शेवग्याच्या पानांमध्ये असलेले घटक त्वचेवरील डाग काढून टाकण्यासही उपयुक्त ठरतात आणि ज्यांना मुरुमांचा त्रास होतो ते देखील याचा वापर करू शकतात. व्हिटॅमिन सीचा स्रोत असण्याव्यतिरिक्त, ते अनेक बायोएक्टिव्ह संयुगांनी देखील समृद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया की शेवग्याच्या पानांपासून बनलेला हा फेसपॅक लावल्याने त्वचेला कसा फायदा होतो आणि त्याचा वापर कसा करावा.

त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही

PubMed नुसार शेवग्यामध्ये फॅटी ॲसिड्स, फिनोलिक ॲसिड्स, स्टेरॉल्स, ऑक्झॅलेट्स, टोकोफेरॉल्स, कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, फ्लेव्हॅनॉल्स, ग्लायकोसाइड्स, टॅनिन, टर्पेनॉइड्स, टर्पिन्स, सॅपोनिन्स, फायलेट्स, अल्कलॉइड्स, ग्लुकोसिनोलेट्स, ग्लायकोसाइड्स आणि आयसोथायोसायनेट्स यांसारखी विविध संयुगे आढळतात. तर शेवगा केसांच्या वाढीस देखील चालना देतो. तसेच, ते मुरुमे कमी करण्यास, डाग फिके करण्यास, वृद्धत्वाची चिन्हे उशिरा येण्यास आणि जखमा लवकर भरण्यास मदत करते, तसेच त्वचेचे संक्रमण रोखते, ज्यामुळे ते त्वचेच्या विकारांसाठी एक वरदान ठरते.

फेस पॅकसाठी लागणारे साहित्य

शेवग्याचा पानांपासून फेस पॅक बनवण्यासाठी, ताजी शेवग्यांची पाने वाटून घ्या किंवा 1 चमचा शेवग्याच्या पानांची पावडर, 1 चमचा मध, 1 चमचा गुलाबपाणी आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घ्या.

तुमची त्वचा संवेदनशील असल्यास, लिंबाचा रस वापरू नका. फेस पॅक लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

फेस पॅकचा थोडासा भाग तुमच्या कोपरावर किंवा कानाच्या मागे लावा आणि तसाच राहू द्या. थोड्या वेळाने तुम्हाला जळजळ जाणवल्यास हा फेसपॅक लावू नका.

हा फेस पॅक कसा बनवायचा?

तुम्हाला फक्त एका वाटीत शेवग्याच्या पानांची पावडर, मध, लिंबाचा रस आणि गुलाबपाणी मिक्स एक गुळगुळीत पेस्ट बनवायची आहे. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर तुम्ही या फेस पॅकमध्ये कोरफड देखील मिक्स करू शकता, ज्यामुळे त्वचा मऊ होण्यास मदत होते.

अशा प्रकारे फेस पॅक वापरा

सर्वप्रथम फेस वॉशने तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाईल आणि फेस पॅकला त्याचे काम प्रभावीपणे करण्यास मदत होईल.

आता या फेस पॅकचा एक पातळ थर तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर, एक चांगले मॉइश्चरायझर लावा.

तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा लावू शकता.

लिंबाचा रस टॅनिंग आणि डाग कमी करण्यासही मदत करतो. मधामुळे त्वचेला आराम मिळतो, तर गुलाबपाणी तुमच्या त्वचेला आर्द्रता देऊन ताजेतवाने करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ