AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस मजबूत आणि जाड करण्यासाठी केसांना लावा ‘या’ पानांचा हेअरमास्क, जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

केस गळणे किंवा केसांना खूप कोरडेपणा येणे हे आजकाल खूप सामान्य झाले आहे. केस मजबूत करण्यासाठी आणि जाड करण्यासाठी या पानांचा हेअरमास्क बनवून लावणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात हेअर मास्क कसा बनवायचा?

केस मजबूत आणि जाड करण्यासाठी केसांना लावा 'या' पानांचा हेअरमास्क, जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
| Edited By: | Updated on: Oct 09, 2025 | 10:34 PM
Share

ताणतणाव, प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे तसेच कोरडेपणा आजकाल या समस्या सामान्य बनल्या आहेत. तर केसांच्या या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेकदा महागड्या केमिकलयुक्त प्रोडक्टचा अवलंब करतो, परंतु कालांतराने त्यांचे दुष्परिणाम आपल्या केसांवर होऊ शकतो. अशातच तुम्हाला केस मजबूत आणि जाड करण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करणे अधिक फायदेशीर ठरेल. याकरिता कडुलिंब आणि तुळस केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. या दोन्ही औषधी वनस्पती शतकानुशतके आयुर्वेदात त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरल्या जात आहेत. त्यांच्यापासून बनवलेला हेअर मास्क केसांना मजबूत आणि जाड करण्यास मदत करू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण हा हेअरमास्क कसा बनवायचा ते जाणून घेऊयात.

कडुलिंब आणि तुळस केसांसाठी कसे फायदेशीर?

कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर असतात.

कोंडा कमी होतो – कडुलिंब स्कॅल्प स्वच्छ ठेवते आणि कोंडा निर्माण करणारे बुरशी आणि बॅक्टेरिया नष्ट करते.

केस मजबूत होतात – कडुलिंबामध्ये असलेले घटक केसांची मुळे मजबूत करून केस गळती कमी करण्यास मदत करते .

स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यास मदत करते – कडुलिंबातील हे घटक स्कॅल्पवरील घाण काढून टाकते त्यामुळे खाज येत नाही आणि संसर्ग देखील रोखता येते.

त्याचवेळी तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

केसांची वाढ – तुळशीमुळे स्कॅल्पमध्ये रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची वाढ जलद होते.

केस चमकदार होतात- तुळशीमध्ये असलेले हे घटक केस चमकदार आणि मऊ बनवते.

संसर्गापासून संरक्षण- कोणत्याही प्रकारचे स्कॅल्पचे संक्रमण किंवा खाज कमी करण्यासाठी तुळस खूप प्रभावी आहे.

कडुलिंब आणि तुळशीचा हेअरमास्क कसा बनवायचा?

साहित्य

  • कडुलिंबाची पाने (सुमारे मूठभर)
  • तुळशीची पाने (सुमारे मूठभर)
  • दही ( 2-3 टेबलस्पून) किंवा नारळ तेल (2-3 टेबलस्पून)
  • कोरफड जेल (1 चमचा)

हेअरमास्क बनवण्याची पद्धत

  • सर्वप्रथम कडुलिंब आणि तुळशीची पाने नीट धुवा.
  • या पानांमध्ये थोडेसे पाणी टाकून घट्ट आणि गुळगुळीत पेस्ट बनवा.
  • आता या पेस्टमध्ये 2 ते 3 चमचे दही किंवा नारळाचे तेल आणि 1 चमचा कोरफड जेल मिक्स करा.
  • हा तयार केलेला मास्क तुमच्या स्कॅल्पला आणि केसांच्या मुळांवर पूर्णपणे लावा.
  • 30 मिनिटे ते 1 तास तसेच लावून ठेवा.
  • मास्क सुकल्यानंतर सौम्य शाम्पू आणि कोमट पाण्याने केस चांगले धुवा. अशाने तुमचे केस मजबूत आणि जाड होण्यास मदत होईल.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.