AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकूनही या 3 प्रकारच्या साड्या खरेदी करू नका, अन्यथा पश्चाताप होईल

साडी खरेदी करताना योग्य निवड असणे फार गरजेचं असतं. कारण आपली आवड तर असेतच पण सोबतच आपला वेळ आणि पैसेही त्यात गुंतलेले असतात. त्यासाठी अशा 3 प्रकारच्या साड्या आहेत ज्यांना खरेदी करणं नक्कीच टाळल्या पाहिजेत.

चुकूनही या 3 प्रकारच्या साड्या खरेदी करू नका, अन्यथा पश्चाताप होईल
Avoid These 3 Saree TypesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2025 | 4:35 PM
Share

साड्या हा भारतीय महिलांची सर्वात पसंतीची आणि जवळची गोष्ट. प्रत्येक महिलेच्या कपाटात 10 ते 15 पेक्षा जास्तच साड्या दिसतील. तसेच अनेक महिलांच्या घरी तर अख्खंच्या अख्खं कपाटच फक्त साड्यांसाठी असतं. तसेही साडी हा शतकानुशतके महिला वापरत आल्या आहेत. भारतीय परंपरेमध्ये साडीचे महत्त्व फारच असते. विशेषत: सणांच्या काळात साडी महत्वाची मानली जाते. शक्यतो सर्वच स्त्रिया सणांच्या दिवशी आवर्जून नेसतात.

साडीची योग्य निवड करण्यात फसतो

पण कधीकधी साडी खरेदी करताना साडीची योग्य निवड करण्यात फसतो. मग अशावळी ती साडी पुन्हा रिटर्न करणे देखील शक्य नसते. बर आपल्याकडे अशाही साड्या कलेक्शनमध्ये असतात ज्यांचा वापर आपण करू शकत नाही किंवा हव्या तशा त्या नेसू शकत नाही. किंवा त्या नेसल्यानंतर लूक काहीसा बरोबर दिसत नाही. मग अशावेळी या साड्या तशाच पडून राहतात. याचसाठी स्टायलिस्ट आशी वर्माने एका व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिने कोणत्या साड्यांची खरेदी करणे टाळले पाहिजे हे सांगितले आहे.

दोन परस्पर विरोधी रंगांची साडी

दोन रंगांचे मिश्रण असलेली साडी न घालणे. विशेषतः खूपच कॉन्ट्रास्ट. उदाहरणार्थ, गुलाबी आणि जांभळा, किंवा पिवळा आणि निळा. हा लूक खूपच जुना वाटतो. दुसरे म्हणजे, अशा साड्या तुम्हाला तुमच्या वास्तविक उंचीपेक्षा कमी दर्शवतात किंवा अशा साड्या नेसल्याने उंचीसोबतच लूकही फार आकर्षक दिसत नाही.

भरपूर रफल असलेल्या साड्या

सध्या बऱ्याच महिलांच्या कपाटात सर्व साड्यांच्या कलेक्शनमध्ये एक साडी आवर्जून अॅड झाली आहे ती म्हणजे रफल साडी. पण तसं पाहायाला गेलं तर रफल साड्यांचा ट्रेंड आता जुना झाला आहे. काही महिलांवर तर या रफल साड्या अजिबातच उठून दिसत नाहीत. रफल साड्या काही विशिष्ट पार्टींसाठीच फक्त सूट होतात. अन्यथा त्या प्रत्येक वेळी नेसणे शक्य होत नाही. त्याऐवजी, जॉर्जेट आणि शिफॉन सारख्या फ्लॉय फॅब्रिकपासून बनवलेल्या साध्या साड्या निवडणे म्हणजे एक उत्तम गुंतवणूक असू शकते. यामध्ये नक्कीच एक सुंदर आणि आकर्षक लूक मिळतो.

कडक कॉटन साडी

कडक सुती कापडापासून बनवलेल्या साड्या खरेदी करणे देखील एक प्रकारे चुकीचा निर्णय ठरू शकतो. कारण अशा साड्यांना हाताळणे हे मोठे आव्हान आहे शिवाय वेळखाऊ देखील आहे. या साड्यांचे पर्याय पटकन कोणत्या कार्यक्रमात नेसून जाण्याइतका सोपा पर्याय नक्कीच नाही. कारण त्या साड्या फुगतात त्यामुळे त्यांना नेसताना मेहनत लागते. त्याऐवजी, मऊ सूत असलेली कॉटनची साडी निवडा. ते अधिक आरामदायक आणि सुंदर दिसतील.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.