AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Care | तुम्हालाही आहेत का ‘या’ वाईट सवयी? थांबा! अन्यथा होईल चेहऱ्यासह आरोग्याचे नुकसान!

आपण आपल्या या सवयींबद्दल जाणून घेतले पाहिजे, ज्यामुळे आपला चेहरा आणि आरोग्यास नुकसान होऊ शकते.

Beauty Care | तुम्हालाही आहेत का ‘या’ वाईट सवयी? थांबा! अन्यथा होईल चेहऱ्यासह आरोग्याचे नुकसान!
चेहर्‍यावरील अनवॉंटेड केस काढून टाकण्यासाठी करा हे घरगुती उपाय
| Updated on: Dec 28, 2020 | 4:59 PM
Share

मुंबई : आपण अन्न, व्यस्त जीवनशैली आणि प्रदूषण हे आपल्या त्वचेच्या समस्येला कारणीभूत मानतो. परंतु, आपल्या काही सवयी देखील त्वचेच्या समस्या वाढवण्याचे काम करतात. होय, आपल्यापैकी बरेचजण हाताची नखे सतत ददाताने चावतात. नखे चावण्याचा अर्थ असा आहे की, आपण चिंताग्रस्त आहोत. या गोष्टींवर विश्वास ठेवणे थोडे कठीण असले, तरी या सवयी आपले सौंदर्य डाग लावण्याचे काम करतात (Bad Habits that affect on skin and health).

कुठेतरी आपणही या सवयींचा बळी पडत नाही ना? जर, आपणही या सवयींच्या अधीन असाल आणि यातून मुक्त होऊ इच्छित असाल, तर आम्ही आपल्याला काही टिप्स सांगणार आहोत. प्रथम आपण आपल्या या सवयींबद्दल जाणून घेतले पाहिजे, ज्यामुळे आपला चेहरा आणि आरोग्यास नुकसान होऊ शकते.

मुरुमांना सतत हात लावणे

चेहऱ्यावरील मुरुमांना हात लावू नये, असे आपण मोठ्यांकडून बरेचदा ऐकले आहे. वारंवार मुरुमांना स्पर्श केल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. याशिवाय मुरुमांमध्ये भरलेला द्रव त्वचेच्या इतर पेशींच्या संपर्कात येतो आणि त्यांचा संसर्ग वाढवतो. म्हणून मुरुमांना सतत हात लावणे ही सवय टाळली पाहिजे.

आवश्यकतेपेक्षा जास्त फेशिअल एक्स्प्रेशन

बर्‍याच लोकांना चेहर्‍याचे हावभाव अधिक उठावदारपणे व्यक्त करणे आवडते. परंतु, असे केल्याने आपली त्वचा तिचा घट्टपणा गमावते आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. जर आपण ही सवय सोडू शकत नसाल, तर दररोज अँटी रिंकल क्रीम लावण्यास विसरू नका (Bad Habits that affect on skin and health).

नखे चावणे किंवा चघळणे

बालपणात आपल्यापैकी बर्‍याच लोकांना नखे ​​चघळण्याची सवय असते. नखे चघळण्यामुळे किंवा चावण्यामुळे शरीरात बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. नखे चघळण्याने, नखातील घाण तोंडा वाटे शरीरात जाते, ज्यामुळे आपले आरोग्य खराब होऊ शकते.

मेकअप न काढता झोपणे

बरेच लोक मेकअप न काढता झोपी जातात. मेकअपमुळे तुमच्या पोर्समध्ये आणि तैलग्रंथींमध्ये ग्लेड भरले जाते, ज्यामुळे त्वचा श्वास घेऊ शकत नाही. मेकअपसह झोपल्यामुळे मुरुमांचा धोका वाढतो. म्हणूनच, मेकअप काढून टाकल्यानंतर, आपण त्वचेला क्लीन्सरने स्वच्छ केले पाहिजे आणि मॉइश्चरायझर लावून मगच झोपावे.

गलिच्छ मेकअप ब्रशेसचा वारंवार वापर

काही लोक बर्‍याच वेळा अस्वच्छ मेकअप ब्रशेस वापरतात. ज्याप्रमाणे आपण आपले दात घासण्याचे आणि केसांचे ब्रशेस स्वच्छ ठेवतो, तसे मेकअप ब्रशेस देखील स्वच्छ ठेवले पाहिजेत. मेकअप ब्रशमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे बॅक्टेरियाचे संक्रमण होऊ शकते. म्हणून आपण आठवड्यातून एकदा गरम पाणी आणि शॅम्पूचा वापर करून आपले मेकअप ब्रश स्वच्छ करायला विसरू नये.

(Bad Habits that affect on skin and health)

हेही वाचा :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.