खराब जीवनशैलीमुळे वाढतो आजारांचा धोका, हार्ट ॲटॅकचा धोका सर्वाधिक

सेंटर फॉर कम्प्यूटेशन बायोलॉजी च्या एका संशोधनातून असा खुलासा झाला आहे की, वयाच्या 50 व्या वर्षानंतर होणारे बहुतांश आजार हे खराब जीवनशैलीमुळे होतात.

खराब जीवनशैलीमुळे वाढतो आजारांचा धोका, हार्ट ॲटॅकचा धोका सर्वाधिक
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 11:29 AM

वाढते वय आणि खराब जीवनशैली यामुळे अनेक आजार (falling sick) होण्याचा धोका असतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, काही आजार अनुवांशिक देखील असतात. हार्ट ॲटॅक, कॅन्सर यांसारखे काही आजारही (diseases) जीन्समुळे होतात, असे म्हटले जाते. पण हे गंभीर आजार होण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे खराब जीवनशैली (bad lifestyle) असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून नमूद करण्यात आले आहे. यासोबतच खाण्या-पिण्याच्या सवयी आणि राहण्याची पद्धत हेही आजारांना प्रोत्साहन देते.

सेंटर फॉर कम्प्यूटेशन बायोलॉजी च्या एका संशोधनातून असा खुलासा झाला आहे की, वयाच्या 50 व्या वर्षानंतर होणारे बहुतांश आजार हे खराब जीवनशैलीमुळे होतात. या वयानंतर अनुवांशिकतेमुळे आजार होण्याचा धोका कमी होतो. पण त्या व्यक्तीचा आहार कसा आहे, ती व्यक्ती कोणत्या वातावरणात राहते, हे सर्व घटक आजार होण्यामागचे एक मोठे कारण ठरू शकते. या संशोधनात शास्त्रज्ञांनी 1 हजार लोकांचा अभ्यास केला. ज्यामध्ये असं आढळून आलं की वाढत्या वयानुसार जीन्समुळे होणाऱ्या आजारांचा धोका खूप कमी असतो. पण ज्या व्यक्तींची जीवनशैली खराब आहे, ते लोक अनेक आजारांना बळी पडू शकतात.

हार्ट ॲटॅकचा धोका अधिक – आजकाल अनेक लोकांना लहान वयातच हृदयविकाराचा झटका येत आहे. असे असले तरी लोकांची खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळ हृदयविकाराचा धोका सर्वाधिक असतो. आपण कोणते अन्न खातो, काय जेवतो, या सर्वांचा परिणामही आपल्या हृदयाच्या कार्यावर होत असतो. अन्न पदार्थांमध्ये फॅट्सचे (चरबी) प्रमाण जास्त असल्यानेही हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय खराब जीवनशैलीमुळे कर्करोगासारख्या धोकादायक आजार होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

मधुमेहाचाही धोका – जसजसं वय वाढतं तसा टाइप-2 मधुमेहाचा धोकाही वाढतो. अनेक वेळा मधुमेह हा अनुवांशिकही असतो, पण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैली बिघडल्यामुळे हा आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. या संशोधनात असेही म्हटले आहे की, वयाच्या 50 व्या वर्षानंतर अल्झायमर आणि इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याचा धोकाही खूप जास्त असतो.

अशी ठेवा जीवनशैली –

– झोपेचा पॅटर्न योग्य ठेवावा, रात्री लवकर झोपावे व सकाळी लवकर उठावे.

– जेवणामध्ये फॅट्सचे प्रमाण कमी ठेवावे आणि प्रोटीन व व्हिटॅमिन्सचे सेवन जरूर करावे.

– दररोज किमान अर्धा तास तरी व्यायाम करावा.

– सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करावे.

– दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी प्यावे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.