उन्हाळ्याच्या हंगामात घरी तयार करा केळी आणि कलिंगडचा फेस मास्क, वाचा !

उन्हाळ्याच्या हंगामात घरी तयार करा केळी आणि कलिंगडचा फेस मास्क, वाचा !
त्वचा

वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 31, 2021 | 4:16 PM

मुंबई : वाढत्या तापमानाचा परिणाम त्वचेवर होत असून तेलकट टी झोन, पुरळ, मुरुम आणि ब्रेकआउट्सची शक्यता असते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची विशेष काळजी ही घेतली गेली पाहिजे. सध्या बऱ्याच ठिकाणी लाॅकडाऊन असल्यामुळे आपण पार्लरमध्ये जाऊ शकत नाहीत. यासाठी आपल्याला घरात असलेल्या साहित्याच्या आधारेच त्वचेची काळजी घ्यावी लागणार आहे. उन्हातही त्वचा तजेलदार दिसण्यासाठी आज आम्ही खास फेस मास्क सांगणार आहोत. (Banana and watermelon face mask is beneficial for the skin)

आपण केळी आणि कलिंगडचा फेस मास्क घरी तयार करू शकतो. यासाठी केळीचे तुकडे आणि किसलेले कलिंगड घ्या. केळी आणि कलिंगड बारीक करून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट 10 ते 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवा. तसेच आपण दही आणि कलिंगडचा फेसपॅक तयार करू शकतो. यासाठी दोन चमचे दही आणि कलिंगडचा रस मिक्स करा आणि 10 ते 15 मिनिटे हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. हे दोन्ही फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावू शकतो.

यामुळे उन्हाळ्यातही आपली त्वचा सुंदर दिसते. दोन चमचा बारीक खडेमीठ घ्या त्यामध्ये तीन चमचे दही आणि लिंबाचा रस मिसळा आणि दहा मिनिटांनंतर आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहऱ्यावरील पेस्ट सुकल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपला चेहरा तजेलदार दिसेल. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन वेळा लावला पाहिजे. फेसपॅक बनविण्यासाठी कॉफी पावडर एक चमचा मधात व्यवस्थित मिसळा आणि हातांनी हलक्या हाताने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटांसाठी पॅक चेहऱ्यावर ठेवा. मग आपले तोंड धुवा.

खरं तर, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि चेहर्‍यावरील सुरकुत्याची समस्या दूर होते. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावला पाहिजे. सर्वांत अगोरद अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि ते बारीक करून घ्या. त्यामध्ये ताजे दही घाला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवा यामुळे तुमचे स्क्रब देखील होईल. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा याचा फायदा त्वचेला होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Banana and watermelon face mask is beneficial for the skin)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें