Skin Care : ‘या’ तेलाचे फक्त दोन थेंब तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या दूर करू शकतात, कसे वापरायचे ते जाणून घ्या!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 19, 2021 | 7:02 AM

बदामामध्ये व्हिटामिन ए, ई, डी, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् त्यात मुबलक प्रमाणात आढळतात. या सर्व गोष्टी त्वचा निरोगी करण्यासाठी काम करतात. बदामाच्या तेलाचा दररोज वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.

Skin Care : 'या' तेलाचे फक्त दोन थेंब तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या दूर करू शकतात, कसे वापरायचे ते जाणून घ्या!
बदाम तेल
Follow us

मुंबई : बदाम केवळ आपल्या आरोग्यासाठीच नव्हे तर आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. तुम्ही त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आणि चेहरा चमकदार करण्यासाठी बदामाचे तेल वापरू शकता. बदामाचे तेल गुणधर्मांचा खजिना मानले जाते. (2 drops of almond oil is beneficial for the skin)

बदामामध्ये व्हिटामिन ए, ई, डी, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् त्यात मुबलक प्रमाणात आढळतात. या सर्व गोष्टी त्वचा निरोगी करण्यासाठी काम करतात. बदामाच्या तेलाचा दररोज वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात आणि वृद्धत्वाचा प्रभाव संपतो.

1. जर लॅपटॉप किंवा मोबाईलवर सतत व्यस्त राहिल्याने किंवा झोपेच्या अभावामुळे तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर तुम्ही बदामाचे तेल वापरावे. बदामाच्या तेलाचे दोन थेंब प्रभावित भागात दररोज रात्री लावून हलक्या हाताने मालिश केल्यास खूप फायदा होतो. या व्यतिरिक्त, जर तुम्ही या तेलाला थोड्या मधाने मसाज केलात तर चांगले परिणाम दिसून येतात.

2. जर तुमच्या मानेवर किंवा चेहऱ्यावर बारीक रेषा दिसू लागल्या असतील तर बदामाच्या तेलाच्या दोन थेंबांमध्ये समान प्रमाणात खोबरेल तेल मिसळा. यानंतर, हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा आणि रात्रभर असेच राहू द्या. असे रोज केल्याने सुरकुत्या कमी होतील. मालिश करण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे धुवा.

3. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मेकअप केला असेल तर तुम्ही हे तेल मेकअप रिमूव्हर म्हणून देखील वापरू शकता. यासह तुमचा मेकअपही दूर होईल आणि त्वचाही चमकू लागेल.

4. ज्यांच्या त्वचेवर मुरुमाची समस्या आहे. त्यांनी बदामाचे तेल वापरणे आवश्यक आहे. यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेतून बॅक्टेरिया काढून टाकण्याचे आणि आतून छिद्र साफ करण्याचे काम करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(2 drops of almond oil is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI