Aloe Vera Benefits : कोरफड केसांसाठी अत्यंत फायदेशीर, अशाप्रकारे वापरा!

केस मजबूत आणि चमकदार करण्यासाठी कोरफड जेल अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि अमीनो अॅसिड असते. हे केसांना निरोगी बनविण्यात मदत करते. हे तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करते. आ

Aloe Vera Benefits : कोरफड केसांसाठी अत्यंत फायदेशीर, अशाप्रकारे वापरा!
केसांची काळजी

मुंबई : केस मजबूत आणि चमकदार करण्यासाठी कोरफड जेल अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि अमीनो अॅसिड असते. हे केसांना निरोगी बनविण्यात मदत करते. हे तुमचे केस मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करते. आपण इतर घटकांमध्ये मिसळून कोरफड हेअर मास्क अनेक प्रकारे बनवू शकता. चला जाणून घेऊयात कोरफडचा हेअर मास्क नेमका कसा तयार करायचा हे बघणार आहोत. (Aloe Vera is extremely beneficial for hair)

कोरफड आणि दही हेअर मास्क – हा मास्क आपल्या केसांची चमक राखण्यासाठी वापरला जातो. हे कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करते. हे जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. जे टाळूला निरोगी आणि खोल पोषण देण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला 2 चमचे दही, 2 चमचे कोरफड जेल आणि 2 चमचे मध लागेल. हे सर्व साहित्य मिसळा आणि मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत लावा. या नंतर 10 मिनिटांसाठी टाळूवर मालिश करा आणि 1 तास सोडा. थंड पाण्याने ते धुवा.

कोरफड आणि खोबरेल तेल हेअर मास्क – हा मास्क केस लांब आणि जाड बनवण्यास मदत करतो. कोरड्या केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करते. यामुळे केस मऊ होतात. यासाठी तुम्हाला 2 चमचे कोरफड जेल आणि 2 चमचे खोबरेल तेल लागेल. ते तयार करण्यासाठी, कोरफड जेल आणि खोबरेल तेल मिसळा आणि हे मिश्रण 30 मिनिटे मंद आचेवर शिजवा. हलक्या हातांनी टाळूवर मालिश करा. यानंतर, पॅक आपल्या केसांवर समान रीतीने लावा. आपण आठवड्यातून दोनदा त्याचा वापर करू शकता.

कोरफड आणि अॅपल सायडर व्हिनेगर हेअर मास्क – हा मास्क खाज आणि कोंडाची समस्या दूर करण्यास मदत करू शकतो. हा मास्क केसांना हायड्रेशनला प्रोत्साहन देतो. यासाठी तुम्हाला 1 कप कोरफड जेल, 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचे मध लागेल. हे सर्व साहित्य एकत्र करा आणि केस आणि टाळूवर लावा. 20-30 मिनिटे सोडा आणि नंतर अँटी-डँड्रफ शैम्पूने धुवा. आपण दर दुसऱ्या आठवड्यात हा मास्क लावू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

Weather change sickness । बदलत्या हवामानात चुकूनही करु नका या 5 चुका, आजारी पडाल

(Aloe Vera is extremely beneficial for hair)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI