Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी ‘हा’ कोरफडचा खास फेसपॅक वापरा

कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे.

Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी 'हा' कोरफडचा खास फेसपॅक वापरा
सुंदर त्वचा

मुंबई : ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो. (Aloes and turmeric are beneficial for face pack)

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कोरफडचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला दोन चमचे कोरफड, एक चमचा दही, एक चमचा हळद, एक चमचा गुलाब पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल. आपण आठवड्यातून तीन वेळा हा फेसपॅक वापरला पाहिजे.

कोरफडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. कोरफड जेलचा वापर मॉइश्चरायजरसारखा करू शकता. कोरफड जेल तुम्ही नखांनाही लावू शकता. हे जेल नखांनासुध्दा मॉइश्चरायज करून मजबूत आणि चमकदार बनवेल. कोरफडीचा गर वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कोरफडमध्ये व्हिटामिन आणि फायबर गुणधर्म असतात. दररोज कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कोरफडीत मुबलक प्रमाणात ‘ई’ जीवनसत्व आढळते. त्यामुळे सुकलेल्या किंवा फाटलेल्या ओठांसाठी ही वनस्पती औषध ठरते.

फुटलेल्या ओठांवर कोरफड जेल लावल्यास ओठ मुलायम होतात. कोरफड जेलमध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल मिसळून लिप बामसारखे देखील वापरू शकता. सकाळी उठल्यावर डोळे सुजलेले आणि थकल्यासारखे जाणवत असल्यास कोरफडीचे पान मध्यभागी कापून डोळ्यावर ठेवल्यास आराम वाटेल. डोळ्यांच्या भोवती कोरफड जेल लावल्यास काळीवर्तुळे नाहीशी होतात. कित्येक अंडर आय क्रीम्समध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो.

(टीप – कोणत्याही वैद्यकीय, आयुर्वेदिक सल्ल्याचं पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

(Aloes and turmeric are beneficial for face pack)