Skin Care : सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्याला ‘हे’ फेसपॅक लावा!

हायड्रेटड नसलेल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ शकतात. त्यामुळे हे सर्व टाळायचं असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

Skin Care : सुंदर आणि तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्याला 'हे' फेसपॅक लावा!
फेसपॅक

मुंबई : जर आपली त्वचा हायड्रेटेड नसेल तर चेहरा कोमेजलेला वाटतो. हायड्रेटड नसलेल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ शकतात. त्यामुळे हे सर्व टाळायचं असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार दिसण्यास मदत मिळते. यामुळे चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होण्यास देखील मदत मिळते. (Apply this face pack on the face for beautiful and radiant skin)

आपल्या सर्वांना माहीती आहे की, आपल्या त्वचेसाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. आपण जर चेहऱ्याला लिंबू आणि काॅफीचा फेसपॅक लावला तर आपल्या त्वचेच्या स्सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल. लिंबाच्या रस आणि कॉफीचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचा कॉफी पावडर घ्या आणि त्यात आवश्यक प्रमाणात लिंबाचा रस घाला.

कॉफी फेसपॅक तयार करण्यासाठी एकत्र मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. त्यानंतर वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. काॅफी, गुलाब पाणी आणि मधाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला दोन चमचे काॅफी, गुलाब पाणी दोन चमचे आणि मध तीन चमचे लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.

साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि चेहरा कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण दररोज चेहऱ्याला लावला पाहिजे. कॉफीचा नियमित वापर बॅक्टेरियामुळे होणार्‍या मुरुमांशी लढण्यास मदत करू शकतो. कारण कॉफीमध्ये दाहक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यासाठी आपण 3 चमचे ग्राउंड कॉफी आणि 2 चमचे ब्राउन शुगर एकत्र मिसळा आणि चेहऱ्याला लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply this face pack on the face for beautiful and radiant skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI