Skin care : ‘हे’ खास फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या समस्यांना बाय बाय बोला!

चमकदार आणि हेल्दी त्वचा आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. परंतु, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या, पुरळ आणि काळपटपणा येतो.

Skin care : 'हे' खास फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या समस्यांना बाय बाय बोला!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 4:40 PM

मुंबई : चमकदार आणि हेल्दी त्वचा आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. परंतु, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या, पुरळ आणि काळपटपणा येतो. यावर बर्‍याच प्रकारची उत्पादने बाजारात येतात. परंतु, ही उत्पादने किती प्रभावी आहेत, हे आपल्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. चेहऱ्याच्या या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (Apply this face pack on the face, there will be many benefits)

तांदूळ केवळ स्वादिष्ट अन्न तयार करण्यासाठीच नव्हे, तर त्वचेच्या उपचारांसाठीही वापरले जातात. तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काही वेळाने धुवून टाका. यामुळे आपली त्वचा सुंदर होते.

जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असल्यास ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावी. मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा देखील तजेलदार होते. जर आपली त्वचा तेलकट असल्यास याचा जास्त फायदा होईल. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा फायदा होतो. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.

मुरुमांचा त्रास असल्यास चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि मुरुमांवर लावा. आपण हा पॅक चेहऱ्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास नक्की मदत मिळेल. पाच चमचे दही, दोन चमचे बदाम किंवा ऑलिव्ह तेल, एक ग्लास गरम पाणी, एक सूती रुमाल सर्वप्रथम, बदाम तेल दहीमध्ये मिसळा आणि चमच्याने चांगले मिक्स करा तयार केलेले मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटांसाठी मालिश करा. यानंतर, एक सूती रुमाल कोमट पाण्यात भिजवून चेहरा स्वच्छ करा.

मध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीइन्फ्लेमेटरी असते. ज्यामुळे मुरुम कमी होण्यास मदत होते. मुरुमावर एक-दोन थेंब मध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी पाण्याने चेहरा धुवा. आहारात जास्त तेलकट पदार्थांचा समावेश केला तर चेहऱ्यावरील मुरुमाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे आहारात शक्यतो तेलकट पदार्थ घेणे टाळाच.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

(Apply this face pack on the face, there will be many benefits)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.