Hair Care :  केसांना ‘हा’ हेअर मास्क लावा आणि सुंदर केस मिळवा ! 

केसांना पुरेसे पोषण मिळाले तर आपले केस निरोगी राहू शकतात. कमकुवत केसांमुळे डोक्यातील कोंडापासून विभाजीत केसांच्या समस्या उद्भवतात, अशा केसांना संपूर्ण पोषण आवश्यक असते.

Hair Care :  केसांना 'हा' हेअर मास्क लावा आणि सुंदर केस मिळवा ! 
सुंदर केस
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 21, 2021 | 5:20 PM

मुंबई : केसांना पुरेसे पोषण मिळाले तर आपले केस निरोगी राहू शकतात. कमकुवत केसांमुळे डोक्यातील कोंडापासून विभाजीत केसांच्या समस्या उद्भवतात, अशा केसांना संपूर्ण पोषण आवश्यक असते. मात्र अनेक उपाय करून देखील आपले केस चांगले होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस मुलायम, चमकदार आणि सुंदर होतील. (Apply this hair mask to the hair and get beautiful hair)

केसांच्या हा खास हेअर मास्क तयार करण्यासाठी सुध्द तूप तीन चमचे, दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा खोबरेल तेल मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि ही संपूर्ण पेस्ट आपल्या केसांना लावा. त्यानंतर साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून साधारण चार ते पाच वेळा केसांना लावली पाहिजे. यामुळे आपले केस चमकदार आणि मऊ होतात आणि केस गळतीची समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

लिंबाचा रस काढून तो केसांच्या मुळाशी लावावा. 10 ते 15 मिनिटांनी केस आधी पाण्याने धुवून, पुन्हा शॅम्पूने धुवा. यामुळे केस चमकदार होतील आणि डोक्यातील कोंडा आणि खाजही दूर होण्यास मदत होईल. खोबरेल तेल केसांना मॉयश्चरायझ करण्याचे काम करते. खोबऱ्याचे तेल थोडसे कोमट करून त्याने डोक्याचा मसाज करावा. त्यामुळे कोंड्याची समस्या कमी होईल. तूप केसांना हायड्रेट करते. केसांमध्ये ओलावा कमी झाल्यामुळे केस निस्तेज व खराब होतात.

अशा केसांसाठी तूप उत्तम उपाय आहे. त्यात आढळणारे हेल्दी फॅटी अॅसिड स्कल्पचे पोषण करून केसांच्या मुळांना हायड्रेट करतात. ज्यामुळे केस मऊ होतात. केसांखालच्या त्वचेवर कोमट ऑलिव्ह तेल लावल्याने केसांखालची स्कीन नरम पडते. यासाठी ऑलिव्ह तेल हातावर घेऊन हलक्या हातांनी डोक्यावरील त्वचेची मालीश करा. मालीश केल्यानंतर ऑलिव्ह तेल डोक्यावर काही तासांसाठी तसेच ठेवा. नंतर हर्बल शॅम्पूने केस धुवून घ्या.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!

Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!

(Apply this hair mask to the hair and get beautiful hair)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें