अॅवकाडोचा गर आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!

अॅवकाडो हे फळ आरोग्यासाठी चांगले आणि एक पौष्टिक फळांपैकी आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आहेत. या फळामुळे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते.

अॅवकाडोचा गर आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!
फेसपॅक

मुंबई : अॅवकाडो हे फळ आरोग्यासाठी चांगले आणि एक पौष्टिक फळांपैकी आहे. ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आहेत. या फळामुळे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हे फळ सलादमध्ये जास्त करून वापरले जाते. मात्र, हे फळ जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यापेक्षाही अधिक हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Avocado and rose water are beneficial for the skin)

अॅवकाडो हे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यात जीवनसत्त्वे बी, सी, ई आणि के, रिबोफ्लेविन, पॅन्टोथेनिक अॅसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ल्यूटिन, बीटा-कॅरोटीन, फॅटी अॅसिडस्, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी असतात. यामुळे हे फळ आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण जर अॅवकाडो त्वचेला लावले तर त्वचेचा अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

अॅवकाडोचा गर चार चमचे घ्या. त्यानंतर त्यामध्ये फक्त गुलाब पाणी मिक्स करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर तीस ते चाळीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. ही पेस्ट आपण सतत आपल्या चेहऱ्याला लावली तर आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

अॅवकाडो फळ सर्वात अगोदर कापुन घ्या त्यानंतर त्यात थोडेसे ऑलिव्ह तेल, मीठ, मिरचीपूड आणि जिरेपूड घाला आणि खा…अशाप्रकारे हे फळ दररोज खाऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात करू शकता. मेटॅबोलिक सिंड्रोम अॅवकाडोमुळे कमी होतो. अॅवकाडो सेवन करणाऱ्यांना ई जीवनसत्त्व, तांबे, मॅग्नेशियम, क जीवनसत्त्व, फोलेट, कबरेदके मिळतात. अॅवकाडो सेवनाने इन्शुलिन व होमोसिस्टीनचे प्रमाण योग्य राहते. होमोसिस्टीन वाढल्यास हृदयविकार होतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Avocado and rose water are beneficial for the skin)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI