No Creams No Facial, घरच्या घरी चमकदार त्वचेसाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो….
Honey for Skincare: आजकाल प्रदुशनामुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हाला त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. निरोगी आणि हायड्रेटेड त्वचेसाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करू शकता. त्वचेचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मध उत्तम पर्याय मानला जातो. त्वचेवर मधाचा वापर केल्यामुळे पिंपल्सच्या समस्या दूर होतात. त्यासोबतच टॅनिंग आणि चोहऱ्यावरील काळे डाग कमी होतात.

चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. बदलत्या वातावरणामध्ये तुमची त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते ज्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो कमी होतो. चेहरा चमकदार बनवण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च केले जातात. परंतु मार्केटमधील क्रिम्समध्ये रसायनिक पदार्थांचा उपयोग केला जातो. या रसायनिक पदार्थांच्या वापरामुळे तुमचा चेहरा खराब होतो. निरोगी त्वचेसाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता ज्यामुळे तुमच्या त्वचेला फायदे होतील. अनेकजण घरच्या घरी फेशियल करण्यास पसंती देतात. घरच्या घरी फेशियल केल्यामुळे नैसर्गिक पदार्थांचा तुमच्या चेहऱ्यावर वापर करता येतो. त्यासोबतच तुमची त्वचा अधिक निरोगी होण्यास मदत होते.
चमकदार त्वचेसाठी त्यांच्यावर मधाचा वापर केला जातो. मध त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जाते. मधामध्ये भरपूर प्रमाणात हायड्रेशन आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेटेड होण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार, अगदी प्राचिन काळापासून चेहऱ्याचे सैंदर्य खुलवण्यासाठी मधाचा वापर केला जातो. चेहऱ्यावर मधाचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक परत येते त्यासोबतच त्यामधील अँटिबॅक्टिरियल गुणधर्म पिंपल्स आणि पिग्मेंटेशनच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
माहितीनुसार, चेहऱ्यावर आठवड्यातून दोनवेळा मध लावल्यामुळे तुमचा चेहरा अधिक मऊ आणि निरोगी होण्यास मदत होते. मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे ज्यामुळे तुमच्या त्वचेला हायड्रेशन मिळतं. हिवाळ्यात त्वचेची आद्रता टिकवून ठेवण्यास आणि चेहरा मऊ करण्यासाठी मधचा चेहऱ्यावर वापर केला जातो. मधाचा आणि हळदीचा फेस पॅक लावल्यामुळे तुमच्या त्वचेवरील टॅनिंग दूर होते. त्यासोबतच पिंपल्स पिग्मेंटेशन सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्ही मधाचा वापर त्वचेला नैसर्गिक रित्या चमकदार आणि निस्तेज बनवण्यासाठी करू शकता. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्या त्वचेला डिटॉक्सिफाय करतात आणि ती चमकदार होण्यास मदत करतात. मधामधील अँटिऑक्सिडेंट्स त्वचेचे छिद्र स्वच्छ करात आणि त्यामध्ये साचलेली घाण आणि अशुद्धता काढून टाकते, ज्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक वाढते. मधाचा नियमित वापर केल्याने तुमच्या त्वचेचा रंग उजळतो आणि तिला नैसर्गिक चमक मिळते. मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात. मुक्त रॅडिकल्स त्वचेच्या पेशींना नुकसान करतात आणि सुरकुत्या, बारीक रेषा यांच्या सारख्या समस्या चेहऱ्यावर दिसून येतात. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेवर असलेले बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत होते. मध त्वचेचे छिद्र स्वच्छ करते आणि त्यामध्ये साचलेली घाण काढून टाकते, ज्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते. याशिवाय, मधामुळे त्वचेची जळजळ कमी होते ज्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात.
मध त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यास मदत करते. मध त्वचेमधील मृत पेशी काढून टाकते आणि ती गुळगुळीत आणि मऊ करते. मध वापरल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि ती गुळगुळीत आणि कोमल होते. याशिवाय, मध त्वचेचा कोरडेपणा दूर करते आणि ती मऊ ठेवते. मध त्वचेसाठी नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते ज्यामुळे त्वचेवरील घाण, तेल आणि मेकअपचे अवशेष निघून जाते आणि त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते. मध वापरल्याने त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण साफ होण्यास मदत होते आणि त्वचेची नैसर्गिक चमक वाढते.
‘या’ पद्धतीनं तुम्ही चेहऱ्यावर मधाचा वापर करू शकता
चमकदार त्वचेसाठी तुम्ही मध तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. मध लावण्यापूर्वी त्वचा हलक्या कोमट पाण्यानी स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर मध लावून 15-20 मिनिटे ते तसेच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्यानी चेहरा धुवा. तुम्हाला हवं असल्यास मधामध्ये तुम्ही दही, लिंबाचा रस, हळद किंवा कोरफडीचे जेल या पदार्थांचा वापर करू शकता ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि तुमची त्वचा हायड्रेटेड राहाण्यास मदत होते. मधासोबत या पादार्थांचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे पिंपल्स आणि पिग्मेंटेशनच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
