AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : कडुलिंबाची पाने, बेसन पीठ आणि दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक! 

स्वच्छ आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. अतिनील किरण, मुरुम, डाग आणि टॅनिंग टाळण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय हे नेहमी केले पाहिजेत.

Skin Care : कडुलिंबाची पाने, बेसन पीठ आणि दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक! 
कढीपत्त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. जे त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. तुम्ही फेसपॅक म्हणून वापरू शकता. हे त्वचेला मॉइस्चराइज करते तसेच सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करते. कढीपत्त्याचा फेसपॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया. कढीपत्ता आणि दही - हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा दही आणि एक चमचा मध मिक्स करून लावा. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल काढून त्वचेला चमक येते. त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्याबरोबरच दही त्वचेच्या समस्या दूर करते.
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 9:42 AM
Share

मुंबई : स्वच्छ आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. अतिनील किरण, मुरुम, डाग आणि टॅनिंग टाळण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय हे नेहमी केले पाहिजेत. या घरगुती उपायांनी तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती उपाय करू शकतो. हे आज आपण बघणार आहोत. (Besan flour and curd face pack is beneficial for the skin)

कडुलिंब, बेसन आणि दही फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला काही कडुलिंबाची पाने/पावडर, 1 चमचा बेसन आणि 1 चमचा दही लागेल. एका भांड्यात दही घाला. त्यात बेसन घालून त्याची पेस्ट बनवा. कडुलिंबाची पूड मॅश करून तिन्ही गोष्टींचे मिश्रण बनवा. हे मिश्रण 10-15 मिनिटांसाठी स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि थंड पाण्याने धुवा. दही त्वचा मऊ आणि मॉइस्चराइज ठेवते. चमकदार त्वचेसाठी कडुलिंबाची पाने फायदेशीर आहेत.

एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध, अर्धा चमचा दही मिसळा. तिन्ही घटक व्यवस्थित मिसळा आणि फेसपॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. अप्लाय केल्यानंतर, ते 15 मिनिटे पुरपणे कोरडे होऊ द्या. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होईल. एक चमचा संत्र्याच्या सालीची पूड घ्या आणि त्यात थोडे कच्चे दूध घाला. सर्व चेहरा आणि मानेवर समान रीतीने लावा. गोलाकार हालचालींमध्ये हळूवारपणे आपल्या बोटाने त्वचेवर मालिश करा.

15 ते 20 मिनिटे सोडा. त्यानंतर तोंड पाण्याने धुवा. चमकदार त्वचेसाठी तुम्ही हा आयुर्वेदिक फेसपॅक आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा वापरू शकता. ताजे दही 1-2 चमचे घ्या आणि त्यात केशर 4-5 घाला. हे घटक एकत्र मिसळा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी त्वचेची मालिश करा. 15-20 मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Besan flour and curd face pack is beneficial for the skin)

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.