त्वचेचे आरोग्य तसेच खोकल्यावर उपाय म्हणून मधाचे करा सेवन; जाणून घ्या याचे फायदे

मधात अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. हे आपल्या पचन प्रक्रियेबरोबरच मन आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Consumption of honey as a remedy for skin health as well as cough; know the benefits)

त्वचेचे आरोग्य तसेच खोकल्यावर उपाय म्हणून मधाचे करा सेवन; जाणून घ्या याचे फायदे
त्वचेचे आरोग्य तसेच खोकल्यावर उपाय म्हणून मधाचे करा सेवन
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 8:12 AM

मुंबई : सध्याच्या कोरोना महामारीमध्ये लोकांना विविध नैसर्गिक उपायांचे महत्व कळायला लागले आहे. अधिकाधिक लोक आता मधाचे विविध गुणकारी गुणधर्म जाणून घेऊन त्याचा वापर करू लागले आहेत. मध सामान्यतः विविध पदार्थांमध्ये वापरला जातो. त्याची चव गोड असते. म्हणूनच मधाकडे एक ‘नैसर्गिक स्वीटनर’ म्हणून पहिले जाते किंबहुना मध तशाच पद्धतीचे कार्य करते, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मधामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात. मधात अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो. हे आपल्या पचन प्रक्रियेबरोबरच मन आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मध अनेक प्रकारे वापरले जाऊ शकते. याबद्दल अनेकांना कमी माहिती आहे. (Consumption of honey as a remedy for skin health as well as cough; know the benefits)

खोकल्यावर औषधी

खोकला कमी करण्यात मध तुम्हाला मदत करू शकते. मधामुळे घशातील खवखव दूर होते. तुम्ही आल्याच्या रसाचे काही थेंब घेऊ शकता आणि त्यात एक चमचा मध घालू शकता. हे मिश्रण तुम्ही काही दिवस झोपण्यापूर्वी घेऊ शकता. यामुळे तुम्ही खोकल्याच्या त्रासावर मात करू शकता.

जखमांवर उपाय

मधात बॅक्टेरियाविरोधी आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. या गुणधर्मांची जखमांना बरे करण्यास मोठी मदत होते. एका अभ्यासानुसार, मध वापरल्याने जखम बरी होण्यास अत्यंत चांगली मदत होते. जखमांवर मध एक उपाय म्हणून लागू होऊ शकतो. परंतु आपण उपचारासाठी मधावर अवलंबून राहू नये. योग्य उपचारांसाठी प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी

मध आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे एक नैसर्गिक ‘मॉईश्चरायझर’ म्हणून कार्य करते. तसेच चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यासदेखील मधाची मदत होते. आपण मधाच्या मदतीने होममेड मास्क आणि स्क्रब तयार करू शकता.

निद्रानाशाच्या समस्येवर उपाय

निद्रानाश ही अशी अवस्था आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला झोपेत खूप अडचण येते, नीट झोप लागत नाही. यावर उपाय करूनही अनेकदा बेचैन होत असते. अशावेळी तुमच्या आहारात मध समाविष्ट केल्याने चांगली झोप लागू शकते. त्यातून शरीराला पुरेसा आराम मिळू शकतो. तुम्ही कोमट दुधात मध मिसळू शकता आणि झोपेच्या आधी पिऊ शकता. हे तुमची झोप सुधारण्यासाठी कार्य करते आणि निद्रानाशासारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करते.

ओठाचे सौंदर्य आणि आरोग्य राखते

ओठांवर उपचार करण्यासाठी मधाचा वापर केला जाऊ शकतो. मध तुमचे ओठ मऊ बनविण्यास मदत करू शकते. यासाठी शुद्ध मध घेऊन ते ओठांवर लावा. ओठांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी मध अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. (Consumption of honey as a remedy for skin health as well as cough; know the benefits)

इतर बातम्या

Video | नदीत पोहण्यासाठी पाण्यात उतरली अन् मध्येच मोठ्याने ओरडली, नेमके कारण काय ?

महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नाही, पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं ट्वीट

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.