Skin Care Tips : टॅन काढण्यासाठी अशा प्रकारे दह्याचा वापर करा, वाचा!

अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेला सन टॅनची समस्या निर्माण होते. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम वापरतो. मात्र, म्हणावा तसा फरक जाणवत नाही. पण यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपाय देखील करून पाहू शकता. टॅन काढण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता.

Skin Care Tips : टॅन काढण्यासाठी अशा प्रकारे दह्याचा वापर करा, वाचा!
त्वचेवरील टॅन

मुंबई : अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेला सन टॅनची समस्या निर्माण होते. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिम वापरतो. मात्र, म्हणावा तसा फरक जाणवत नाही. पण यासाठी तुम्ही काही नैसर्गिक उपाय देखील करून पाहू शकता. टॅन काढण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. टॅन काढण्यासाठी दही हे अत्यंत फायदेशीर आहे.

टॅन काढण्यासाठी दही लावा

1-2 चमचे चांगले ताजे दही एका भांड्यात घ्या आणि चांगले फेटून घ्या. ते चेहऱ्यावर तसेच शरीराच्या टॅन्ड भागांवर लावा. 3-5 मिनिटे मालिश करा. आणखी 15-20 मिनिटे त्वचेवर ठेवा आणि नंतर धुवा. टॅन काढण्यासाठी दही वापरण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे.

दही आणि ओट्स

2-3 चमचे कच्चे ओट्स ग्राइंडर किंवा फूड प्रोसेसरमध्ये ठेवा. त्यात दोन चमचे साधे आणि ताजे दही घालून मिक्स करा. चेहऱ्यावर तसेच शरीराच्या टॅन झालेल्या भागांवर ही पेस्ट लावा. काही मिनिटांसाठी बोटांनी मालिश करा. साध्या पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे त्वचेवर सोडा. आपण आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करू शकता.

मध आणि दही

एक चमचा ताजे दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध घाला. चेहऱ्यावर तसेच टॅन झालेल्या इतर भागांवर ही पेस्ट लावा आणि मालिश करा. त्वचेवर 15-20 मिनिटे सोडा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून 2-3 वेळा केला जाऊ शकतो.

दही, लिंबाचा रस आणि तांदळाचे पीठ

1-2 चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात दही आणि लिंबाचा रस मिसळा. ते एकत्र मिक्स करा आणि चेहऱ्यावर तसेच शरीराच्या टॅन्ड भागांवर लावा. एक्सफोलिएट करण्यासाठी हलक्या हाताने मालिश करा. 15-20 मिनिटे त्वचेवर सोडा आणि थंड पाण्याने धुवा. टॅन काढण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हा उपाय पुन्हा करू शकता.

बटाटा आणि दही

बटाटा घ्या आणि त्याचे साल काढा. बटाट्याचे लहान तुकडे करा आणि ब्लेंडरमध्ये प्युरी बनवा. एका भांड्यात दोन चमचे साधे ताजे दही घ्या आणि त्यात एक चमचा बटाट्याचा रस घाला. एकत्र मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर तसेच शरीराच्या टॅन्ड भागांवर लावा. ते 10 ते 15 मिनिटे सोडा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(curd is extremely beneficial for tan removal)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI