नितळ-निरोगी आणि हेल्दी त्वचा हवीय? मग ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. यासाठी आपण हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करतो, महागडी सौंदर्य उत्पादने वापरतो. त्वचा सुंदर मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

नितळ-निरोगी आणि हेल्दी त्वचा हवीय? मग ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 3:02 PM

मुंबई : प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. यासाठी आपण हजारो रुपये पार्लरमध्ये खर्च करतो, महागडी सौंदर्य उत्पादने वापरतो. त्वचा सुंदर मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. विशेष म्हणजे घरगुती उपाय केल्याने कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. घरगुती उपाय केल्याने मुरुम, काळे डाग, वृद्धत्वाची लक्षणे आपल्या चेहऱ्यावरून गायब होण्यास मदत होते. (Definitely try this face pack for beautiful and healthy skin)

साहित्य 2 चमचे क्ले, 2 एक्टिवेटिड कॅप्सूल, 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर, एक थेंब तेल या सर्व गोष्टी एका भांड्यात चांगल्या मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर लावा आणि 15 मिनिटानंतर तोंड धुवा. हा फेसपॅक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते त्वचेतून जादा तेल काढून टाकण्याचे काम करते. याशिवाय अॅपल सायडर व्हिनेगरचे थेंब आणि तेल मुरुमांशी लढण्यास मदत करतात.

अंड्याचा पांढरा भाग, 3 एक्टिवेटिड कॅप्सूल, एक चमचा लिंबाचा रस हा फेसपॅक तयार करण्यासाठी अंड्याचा पांढर्‍या भाग, एक्टिवेटिड कॅप्सूल आणि लिंबाचा रस चांगला मिक्स करून घ्या आणि पेस्ट तयार करा. ही पेस्ट सुमारे 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. जेव्हा हा फेसपॅक चांगला कोरडा होईल त्यावेळी कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे. यामुळे आपली त्वचा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होते.

आपण स्किनकेअर उत्पादने जास्त वापरत नसाल तरी, किमान मूलभूत स्किनकेयर नित्यक्रम दररोज पाळलेच पाहिजेत. क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे. या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतील. परंतु, नित्यनियमाने केल्यास आपल्या त्वचेत बरेच बदल दिसून येतील. ही उत्पादने निवडताना प्रथम आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्यावा. त्यानुसारच उत्पादने खरेदी करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Definitely try this face pack for beautiful and healthy skin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.