AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : हाताच्या टॅनपासून सुटका करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

टॅनिंगमुळे अकाली वृद्धत्व येण्याचा धोका वाढतो. आपले हात सर्वात जास्त उन्हाच्या संपर्कात असतात. यामुळे हानिकारक किरणांपासून आपल्या हाताचे संरक्षण करणे फार कठिण आहे. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपायही अवलंबू शकता.

Skin Care Tips : हाताच्या टॅनपासून सुटका करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
हाताच्या टॅनपासून सुटका करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 7:37 AM
Share

मुंबई : उष्णता केवळ आपल्या शरीराला केवळ डिहायड्रेटच करीत नाही तर आपल्या त्वचेला निर्जीव आणि कोरडी देखील करते. अतिनील किरणे त्वचेला टॅन करतात. टॅनिंगमुळे अकाली वृद्धत्व येण्याचा धोका वाढतो. आपले हात सर्वात जास्त उन्हाच्या संपर्कात असतात. यामुळे हानिकारक किरणांपासून आपल्या हाताचे संरक्षण करणे फार कठिण आहे. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपायही अवलंबू शकता. (Do this home remedy to get rid of hand tan)

दही आणि हळद पॅक

हळद असमान त्वचेच्या टोनमध्ये सुधारणा करते तर दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात जे त्वचा फिकट आणि मॉइश्चराईझ करतात. एक वाटी दही घ्या आणि त्यात 1 चमचा हळद घाला. हे एकत्र मिसळा आणि मिश्रण आपल्या टॅन झालेल्या हातांवर लावा. सुमारे 20 मिनिटे ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

लिंबाचा रस

लिंबाचा रस असलेले व्हिटॅमिन सी त्वचेच्या पेशींचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते. एक वाटी लिंबाचा रस घ्या आणि टॅन झालेल्या हातांना सुमारे 15 मिनिटे लावा. आपले हात थंड पाण्याने धुवा. यानंतर आपली त्वचा मॉइश्चराइझ करा.

बदाम पेस्ट

बदामांमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असतात. हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी आपण 5 ते 6 बदाम घ्या आणि त्यांना रात्रभर भिजवा. थोडे दूध मिसळून बदामाची पेस्ट बनवा. ही पेस्ट रात्रभर लावून ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.

चंदन व हळद पावडर

दोन चमचे चंदन पावडर आणि हळद घेऊन चांगले मिक्स करा. त्यात 2 ते 3 थेंब गुलाबपाणी मिसळून दाट पेस्ट बनवा. आपल्या हाताला ही पेस्ट लावा आणि 30 मिनिटे ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. या पेस्टमुळे त्वचेचा रंग सुधारतो.

कोरफड जेल

कोरफड जेलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. हे टॅनिंग काढून टाकण्यास मदत करते. कोरफडच्या पानांतून ताजी कोरफड जेल घ्या आणि आपल्या हातावर लावा. रात्रभर ठेवा आणि सकाळी स्वच्छ पाण्याने धुवा.

काकडी पेस्ट

काकडीमध्ये जीवनसत्त्वे भरपूर असतात. जे तुमची त्वचा तजेलदार ठेवू शकतात. हे त्वचेतील चमक परत मिळविण्यात मदत करू शकते. दोन काकडीचा रस घ्या आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. आपल्या हाताला ही पेस्ट लावा आणि 30 मिनिटे ठेवा. यानंतर ते पाण्याने धुवा. (Do this home remedy to get rid of hand tan)

इतर बातम्या

रात्र झाली तरी पालकांचा शाळेत ठिय्या; महागडी पुस्तके आणि वाढीव फीविरोधात पालक आक्रमक

AFMS Recruitment 2021: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये 89 पदांवर भरती, 9 ऑगस्टपर्यंत करा अर्ज

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.