Skin Care : चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी दररोज सकाळी मध, लिंबू आणि लसूण खा!

लसूण खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लसूण खाण्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि लसूण आपल्याला अनेक रोगांपासून दूर देखील ठेवतो.

Skin Care : चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी दररोज सकाळी मध, लिंबू आणि लसूण खा!
सुंदर त्वचा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 26, 2021 | 8:36 AM

मुंबई : लसूण खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लसूण खाण्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि लसूण आपल्याला अनेक रोगांपासून दूर देखील ठेवतो. लसूणमध्ये अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटी ऑक्सिडंट आहेत. आयुर्वेदात लसूण एक उत्तम औषध म्हणून वापरली जाते. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, लसूण फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. (Eat honey, lemon and garlic every morning to relieve the signs of aging on the face)

बदललेल्या जीवनशैलीमुळे अगदी कमी वयामध्येच आपल्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे येतात. वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात. मात्र, म्हणावा तसा फरक पडत नाही. जर आपल्या चेहऱ्यावरही वृद्धत्वाची लक्षणे आली असेल आणि आपली त्वचा देखील सैल पडली असेल तर आपण दररोज सकाळी उपाशी पोटी मध, लिंबू आणि लसूण मिक्स करून खाल्ले पाहिजे. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

मध, लिंबू आणि लसूण नेमका कसा खायचा असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर त्यासाठी लसूणची कळी सोलून घ्या आणि सकाळी उठताच लिंबू आणि मध मिक्स करून प्या. लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाऊ शकता. असे केल्याने हृदय निरोगी राहते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. लसणाच्या सेवनामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते. ज्या लोकांना उच्च रक्तदाब समस्या आहे. त्यांच्यासाठी खूप लसूण खूप फायदेशीर आहे.

अंडी, चंदन पावडर आणि मधाचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक अंडी, दोन चमचे चंदन पावडर आणि एक चमचा मध लागणार आहे. हे वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्याचा मसाज करा. कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण दररोज सकाळी आपल्या चेहऱ्याला लावला तर मुरूमाची आणि पुरळची समस्या दूर होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eat honey, lemon and garlic every morning to relieve the signs of aging on the face)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें