Skin care : हॉट टॉवेल स्क्रब म्हणजे काय?, जाणून घ्या त्याचे फायदे!

तुम्ही कधी हॉट टॉवल स्क्रब आणि त्याचे फायदे याबद्दल ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हॉट टॉवल स्क्रब म्हणजे नेमके काय? हॉट टॉवेल स्क्रब हा एक प्रकारचा स्क्रब आहे जो मृत त्वचा, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सची समस्या दूर करतो.

Skin care : हॉट टॉवेल स्क्रब म्हणजे काय?, जाणून घ्या त्याचे फायदे!
हॉट टॉवेल स्क्रब

मुंबई : वाईट जीवनशैली आणि जंक फूड खाण्याच्या सवयी आपल्या आरोग्यावर तसेच आपल्या चेहऱ्यावर परिणाम करतात. यामुळे मृत त्वचा, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स आणि त्वचेतील छिद्र उघडतात. हे डाग दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे स्क्रब वापरून पाहतो. याशिवाय पार्लरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल आणि स्क्रबही करतो. हे उपाय करूनही त्वचेच्या समस्या काही दूर होत नाहीत. (Extremely beneficial for hot towel scrub skin)

तुम्ही कधी हॉट टॉवल स्क्रब आणि त्याचे फायदे याबद्दल ऐकले आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हॉट टॉवल स्क्रब म्हणजे नेमके काय? हॉट टॉवेल स्क्रब हा एक प्रकारचा स्क्रब आहे जो मृत त्वचा, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सची समस्या दूर करतो. याशिवाय, यामुळे त्वचेचा थकवा आणि ताणही दूर होतो. हा उपाय तुम्ही घरी सहज करू शकता. त्याचा योग्य मार्ग आणि फायद्यांबद्दल जाणून घ्या.

हॉट टॉवेल स्क्रब कसा आहे

हॉट टॉवेल स्क्रब हा एक प्रकारचा उपचार आहे. जो मृत त्वचा आणि ब्लॅकहेड्स एक्सफोलिएटिंग आणि कायाकल्प करण्यास मदत करतो. यासाठी तुम्हाला टॉवेल कोमट पाण्यात भिजवावा लागेल. आता टॉवेलचे पाणी पिळून घ्या आणि चेहऱ्यावर चोळा आणि गोलाकार हालचालीने मालिश करा. हे तुमच्या त्वचेवर स्क्रबसारखे काम करते. या प्रक्रियेदरम्यान, त्वचेचे छिद्र उघडले जातात, घाण साफ होते. गरम टॉवेल घासताना लक्षात घ्या की ते मऊ असावी आणि पाणी जास्त गरम नसावे.

हॉट टॉवेल स्क्रबचे फायदे

-हॉट टॉवेलने स्क्रब करताना शारीरिक आणि मानसिक थकवा निघून जातो. हे स्नायूंना आराम देते.

-हे स्क्रब केल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते. असे केल्याने शरीर सक्रिय राहते.

-हॉट टॉवेल स्क्रब केल्याने शरीराची घाण सहज साफ होते. तसेच संपूर्ण शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. हा उपाय केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Extremely beneficial for hot towel scrub skin)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI