AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ओट्स आणि दह्याचा ‘हा’ फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

ओट्स आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतात. आपण घरचे-घरी ओट्सचे फेसपॅक तयार करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल.

Skin Care : ओट्स आणि दह्याचा 'हा' फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 4:34 PM
Share

मुंबई : ओट्स आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतात. आपण घरचे-घरी ओट्सचे फेसपॅक तयार करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. कारण ओट्समध्ये असे बरेच गुण आहेत जे मुरुमांपासून आणि पिंपल्सपासून मुक्त होण्यास मदत करतात. आपण जर ओट्सचा फेसपॅक सतत आपल्या चेहऱ्याला लावला तर आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. (Face packs of oats and curd are beneficial for the skin)

ओट्सचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे ओट्स, तीन चमचे दही आणि चार चमचे गुलाब पाणी लागणार आहे. हा पॅक घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर ओट्समध्ये दही मिक्स करा आणि एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेलाही लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी अगदी सोप्पा आहे. हा फेसपॅक आपण दररोज देखील आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल. ओट्समध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे मेलेनिनला संतुलित करते आणि गडद रंग गोरा बनवते. ते वापरण्यासाठी आपल्याला एक चमचा मध आणि एक चमचा ग्राउंड ओट्सची आवश्यकता असेल.

दोन्ही गोष्टी मिसळा आणि पेस्ट प्रमाणे तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा गोरा होण्यास मदत होते. ओट्समध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेस मुरुमांपासून संरक्षण करतात. दोन चमचे ओट्स, एक चमचा बेकिंग सोडा आणि पाणी घ्या, आता ओट्स पीसून त्यात बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट गळ्यापासून संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर, थंड पाण्याने तोंड धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face packs of oats and curd are beneficial for the skin)

Follow Us
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...