AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!

कोरोना महामारीमुळे आपण जास्त बाहेर जात नाही. परंतु हानिकारक अतिनील किरण आणि प्रदूषणामुळे त्वचेशी संबंधित समस्यांमधून जावे लागते. याशिवाय हार्मोन्स, तणाव, जास्त घाम येणे आणि सेबममुळे त्वचेच्या समस्याही वाढतात. पुरुषांची जाड, तेलकट त्वचा असते

Skin Care : त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा!
त्वचेची काळजी
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 1:31 PM
Share

मुंबई : कोरोनामुळे आपण जास्त बाहेर जात नाही. परंतु हानिकारक अतिनील किरण आणि प्रदूषणामुळे त्वचेशी संबंधित समस्यांमधून जावे लागते. याशिवाय हार्मोन्स, तणाव, जास्त घाम येणे आणि सेबममुळे त्वचेच्या समस्याही वाढतात. पुरुषांची जाड, तेलकट त्वचा असते आणि स्त्रियांपेक्षा जास्त घाम येतो. आजच्या काळात पुरुषही आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतात. यामुळे त्यांची त्वचा हायड्रेटेड, रेडिएटेड आणि मऊ दिसते. (Follow these skin care tips)

क्लींजिंग

चेहरा आणि शरीरातील साचलेली घाण आणि अशुद्धी काढून टाकण्यासाठी क्लींजिंग करणे फार महत्वाचे आहे. त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सौम्य क्लींझर आणि दूध वापरू शकता. आठवड्यातून 2 ते 3 दिवस त्वचेला एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. तुम्ही लेमनग्रास आणि नीलगिरीसारखे नैसर्गिक साहित्य वापरू शकता. हे छिद्र साफ करून आपली त्वचा मऊ ठेवण्यास मदत करते.

डाग दूर करण्यासाठी सीरम लावा

त्वचा साफ केल्यानंतर त्वचेचे छिद्र उघडतात आणि अधिक पोषकद्रव्ये शोषून घेतात. व्हिटॅमिन सी सीरम आणि अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेसाठी वापरले पाहिजेत. हे त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि पोषण देखील देते. याशिवाय हे कोलेजन वाढवून त्वचा सुधारण्याचे काम करते. यामुळे तुमची त्वचा निरोगी दिसते.

सनस्क्रीन लावा

सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करते. त्वचेला एसपीएफ़ 30 सनस्क्रीन लावा. ते लावल्यास, वृद्धत्वाची चिन्हे लवकर दिसणार नाहीत. ब्युटीशियनच्या मते, चेहरा धुतल्यानंतर दर 2 तासांनी सनस्क्रीन लावावे.

त्वचा मॉश्चराइज ठेवा

बहुतेक लोकांना असे वाटते की, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्वचेला मॉइस्चराइज करण्याची गरज नाही. तर या काळात उष्णता आणि घामामुळे आपण चेहरा पुन्हा पुन्हा धुतो आणि अशा परिस्थितीत त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज ठेवणे कठीण होते. म्हणून या हंगामात त्वचा हायड्रेटेड आणि मॉइस्चराइज ठेवणे फार महत्वाचे आहे.

त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने निवडा

नेहमी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार त्वचेशी संबंधित उत्पादने निवडा. जर तुमची त्वचा कोरडी आणि पुरळ असलेली असेल तर नैसर्गिक उत्पादने वापरा.

संबंधित बातम्या : 

Benefits Of Moringa Oil : त्वचा आणि केसांसाठी शेवग्याचे तेल अत्यंत फायदेशीर!

Health Tip : ऊसाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर, जाणून घ्या अनेक फायदे!

(Follow these skin care tips)

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.