AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care : पावसाळ्यात कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा!

पावसाळ्यामध्ये केस कोरडे पडणे ही एक सामाम्य समस्या आहे. पावसाळ्यात कोरडे केस होण्याचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील ओलावा हे आहे. कोरडे केस पडल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते.

Hair Care : पावसाळ्यात कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी 'या' टिप्स फाॅलो करा!
कोरडे केस
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 11:42 AM
Share

मुंबई : पावसाळ्यामध्ये केस कोरडे पडणे ही एक सामाम्य समस्या आहे. पावसाळ्यात कोरडे केस होण्याचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील ओलावा हे आहे. कोरडे केस पडल्याने केस गळतीची समस्या निर्माण होते. यामुळेच पावसाळ्याच्या हंगामात केस गळतीचे प्रमाण अधिक होते. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या हंगामात देखील केस मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. (Follow these tips to get rid of dry hair problem in rainy season)

अॅवकाडोचा हेअर मास्क

अॅवकाडोचा हेअर मास्क आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. अॅवकाडोचा हेअर मास्क केसांना लावल्याने केसांना नैसर्गिकरित्या नमी येते तसेच केस मजबूत राहतात. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी आपल्याला अॅवकाडोची पेस्ट दोन चमचे, एक चमचा मध, एक अंडे आणि रोझमेरीचे तेल दोन चमचे लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि नंतर शैम्पूने केस धुवा.

तेल लावा

तेल केस मजबूत ठेवण्यात मदत करते. चांगल्या केसांच्या आरोग्यासाठी आपण तेल नियमितपणे वापरू शकता. पावसाळ्यात तुम्ही तेल नियमितपणे लावावे. तेल केस तोडण्यास प्रतिबंध करते. आपण आपल्या केसांनुसार तेल निवडू शकता. हे केसांशी संबंधित इतरही अनेक समस्या दूर करण्यात मदत करू शकते.

डिटोक्स केस

पावसाळ्यातील कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी आपण केसांना डिटोक्स करू शकता. यामुळे केसांच्या टाळूला पोषण मिळेल. डिटोक्स करण्यासाठी आपण एक ते दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि 2 कप गरम पाणी मिसळू शकता. या गोष्टी मिसळून केस स्वच्छ आणि मॉइश्चराइझ करा. हा उपाय आपण आठ दिवसांमधून दोन वेळा केला पाहिजे. ज्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.

केसांना मॉइश्चराइज्ड ठेवा

पावसाळ्यात केसांची निगा राखणे खूप महत्वाचे असते. आपण सीरम वापरू शकता, जे आपल्या केसांना उष्णतेपासून वाचवेल. हे केसांना मॉइश्चरायझेशन करण्यास देखील मदत करेल. नेहमी एक मॉइश्चरायझर निवडा जे आपल्या केसांना हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त कोरफडचे तेल घरच्या घरी कसे बनवाल?; वाचा तर खरं!

(Follow these tips to get rid of dry hair problem in rainy season)

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.