AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care : केसांना तेलाशिवाय मॉइश्चराइझ करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा, वाचा! 

केसांमधून तेल काढण्यासाठी शॅम्पू करणे आवश्यक आहे. रसायनांसह शैम्पू केस अधिक कोरडे आणि निर्जीव बनवतात. जर तुम्हाला तेलकट केसांची मालिश करायची नसेल, पण तरीही तुमचे केस मॉइश्चरायझ करायचे असतील तर आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.

Hair Care : केसांना तेलाशिवाय मॉइश्चराइझ करण्यासाठी 'या' टिप्स फाॅलो करा, वाचा! 
केसांची काळजी
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 19, 2021 | 7:22 AM
Share

मुंबई : केसांना तेल लावणे हा तुमच्या केसांना मॉइश्चराइझ करण्याचा मुख्य मार्ग आहे. परंतु काही केसांचे तेल टाळूचे छिद्र बंद करतात. ज्यामुळे अप्रत्यक्षपणे केस गळतात. बहुतेक स्त्रिया केसांमध्ये तेल लावण्यास संकोच करतात. यामुळे डोक्यात कोंडा होण्याची शक्यता असते.

केसांमधून तेल काढण्यासाठी शॅम्पू करणे आवश्यक आहे. रसायनांसह शैम्पू केस अधिक कोरडे आणि निर्जीव बनवतात. जर तुम्हाला तेलकट केसांची मालिश करायची नसेल, पण तरीही तुमचे केस मॉइश्चरायझ करायचे असतील तर आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.

1. मध

आपल्या केसांना मॉइश्चरायझिंग करण्यासाठी मधात दोन मास्टर ब्लास्टर गुणधर्म आहेत. त्यात शोषक आणि ह्युमेक्टंट गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते केसांना मॉइश्चरायझर बनवते. जर तुम्हाला तुमच्या केसांची चमक टिकवायची असेल तर यासाठी मध खूप फायदेशीर आहे.

2. दही

टाळूच्या चांगल्या स्थितीसाठी दहीमध्ये अत्यंत चांगले निरोगी जीवाणू असतात. हे मुळांपासून केसांना मॉइश्चराइझ करते आणि त्यांना मजबूत करते. जर तुम्हाला लांब केस हवे असतील तर केस गळणे टाळण्यासाठी दही हा सर्वात नैसर्गिक मार्ग आहे. हे कोरड्या केसांना पोषण देते आणि टाळूला हायड्रेटेड ठेवते.

3 अंडी

अंडी केसांसाठी सुपरफूड आहेत. ते जीवनसत्त्वे, फोलेट, बायोटिन आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहेत जे निरोगी केसांसाठी आवश्यक आहेत. हे टाळूचे खोल पोषण करते आणि केस तुटणे आणि गळणे प्रतिबंधित करते. आपले केस धुताना शैम्पूमध्ये अंडी आहेत याची खात्री करा. केसांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अंड्यांची शिफारस केली जाते.

4. एवोकॅडो

एवोकॅडो हे एक फळ आहे. ज्यात बायोटिन आणि जीवनसत्त्वे आहेत. जे केसांच्या चांगल्या गुणवत्तेसाठी आवश्यक असतात. एवोकॅडोने आपल्या केसांसाठी हेअर मास्क तयार करता येते. याशिवाय, एवोकॅडो केस तुटण्याची समस्या टाळते आणि केसांच्या वाढीस देखील प्रोत्साहन देते.

5. केळी

तुमचे केस जाड आणि मजबूत बनवायचे आहेत? त्यांनी केळीचा मास्क वापरा. केळीमध्ये सिलिका आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. हे दोन घटक तुम्हाला डोक्यातील कोंडा आणि कोरड्या टाळूची समस्या कमी करण्यास मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips to moisturize hair)

Follow Us
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...