Beauty Tips : परफ्यूम खरेदी करताना ‘या’ टिप्स फाॅलो करा!

आपण घरातून बाहेर पडण्यापूर्वी परफ्यूम किंवा डीओ लावतो. हे लावल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि घामाचा वास येत नाही. परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच बहुतेक लोक शरीरापेक्षा जास्त कपड्यांवर परफ्यूम लावतात.

Beauty Tips : परफ्यूम खरेदी करताना 'या' टिप्स फाॅलो करा!
परफ्यूम

मुंबई : आपण घरातून बाहेर पडण्यापूर्वी परफ्यूम किंवा डीओ लावतो. हे लावल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते आणि घामाचा वास येत नाही. परफ्यूमचा सुगंध दीर्घकाळ टिकून राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच बहुतेक लोक शरीरापेक्षा जास्त कपड्यांवर परफ्यूम लावतात. पण तुम्हाला परफ्यूम खरेदी करण्याचा योग्य मार्ग माहित आहे का? (Follow these tips when buying perfume)

जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी निवडतो, तेव्हा अधिक लक्ष आणि प्रामाणिकपणा आवश्यक असते. काही गोष्टी आहेत, ज्यांची विशेषतः परफ्यूम खरेदी करताना काळजी घ्यावी लागते. खरं तर, परफ्यूम विकत घेताना, खूप गोंधळ होतो. त्याच्या सुगंधापासून ते पसंतीच्या फॉर्म्युलेशनपर्यंत, लक्ष देणे आवश्यक आहे. जर तुम्ही पहिल्यांदा परफ्यूम खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी या काही खास टिप्स.

रिसर्च करा

कोणताही परफ्यूम विकत घेण्यापूर्वी, त्याबद्दल चांगले संशोधन करा आणि त्याचे सुगंध याबद्दल चांगली माहिती मिळवा आणि परफ्यूम खरेदी करा. परफ्यूम खरेदी करताना आपल्याला इतर उत्पादनांची माहिती देखील मिळते. प्रत्येक परफ्यूमचा स्वतःचा वेगळा सुगंध असतो. त्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी घ्या. आपण याबद्दल इंटरनेटवर वाचू शकता.

सॅंपल परफ्यूम

थेट परफ्यूम खरेदी करण्यापूर्वी, आपल्या मनगटावर सॅंपल परफ्यूम लावून तपासा. काही सुगंध वापरून पहा आणि तुमच्यासाठी योग्य परफ्यूम निवडा.

त्वचेच्या प्रकारानुसार खरेदी करा

कोणत्याही प्रकारचे सौंदर्य उत्पादन किंवा परफ्यूम खरेदी करण्यापूर्वी, आपल्याला आपल्या त्वचेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जर तुमची संवेदनशील त्वचा असेल तर जास्त सुगंध असलेला परफ्यूम वापरू नका. अन्यथा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. प्रत्येकाच्या त्वचेच्या प्रकारानुसार परफ्यूम खरेदी करा.

परफ्यूम लावण्याचा योग्य मार्ग

शरीराच्या कोणत्या भागात परफ्यूम लावून ते जास्त काळ टिकते हे तुम्हाला माहित असले पाहिजे. तुम्ही मनगटाऐवजी अंडरआर्म्सवर आणि कानाच्या मागे परफ्यूम लावावा. या ठिकाणी शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त तापमान असते. याशिवाय जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कपड्यांवर देखील परफ्यूम लावू शकता. त्यामुळे परफ्यूम बराच काळ टिकतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips when buying perfume)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI