केसांच्या बाबतीत ‘ही’ चूक आपण सगळेच करतो, कोणती खबरदारी महत्त्वाची? वाचा

खूप ऊन, धूळ, माती, प्रदूषण, शरीरातील पोषणाची कमतरता इत्यादी केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. यासोबतच आपल्याकडून आणखी एक चूक होतेय ज्याची आपल्याला जाणीव नाही. अनेक हेअर एक्सपर्ट्सचे मत आहे की आपण केस धुताना काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि नकळत चुका करतो, ज्यामुळे केस खराब होऊ लागतात.

केसांच्या बाबतीत 'ही' चूक आपण सगळेच करतो, कोणती खबरदारी महत्त्वाची? वाचा
how to do hair wash Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 1:16 PM

मुंबई: पूर्वी केस उडणे किंवा टक्कल पडणे हे वाढत्या वयाचे लक्षण मानले जात होते, परंतु बदलत्या काळानुसार ही समस्या आता तरुण मुलामुलींसमोर देखील आहे. खूप ऊन, धूळ, माती, प्रदूषण, शरीरातील पोषणाची कमतरता इत्यादी केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. यासोबतच आपल्याकडून आणखी एक चूक होतेय ज्याची आपल्याला जाणीव नाही. अनेक हेअर एक्सपर्ट्सचे मत आहे की आपण केस धुताना काही गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि नकळत चुका करतो, ज्यामुळे केस खराब होऊ लागतात. नंतर केस तुटतात आणि गळून पडतात. जाणून घेऊया हेअर वॉश करताना कोणती खबरदारी घ्यावी.

शॅम्पूने केस चांगले स्वच्छ करावेत, अन्यथा केस खराब होण्याचा धोका वाढतो. आपण सौम्य शैम्पू वापरत असल्याची खात्री करा. तसेच दररोज केस धुवू नयेत याची विशेष काळजी घ्या. आठवड्यातून फक्त 2 ते 3 दिवस शॅम्पूने केस धुवा. केस धुताना केसांना हलका मसाज करा.

केस धुण्यासाठी कधीही जास्त गरम किंवा जास्त थंड पाण्याचा वापर करू नका, कारण दोन्ही प्रकारे केसांचे नुकसान होते. सामान्य पाण्याचा वापर करावा. पाण्यातील घाण किंवा बॅक्टेरिया काढून टाकायचे असतील तर पाणी गरम केल्यानंतर ते नॉर्मल करा आणि नंतर वापरा.

जेव्हा आपण केसांना शॅम्पू लावता तेव्हा कंडिशनर सुद्धा लावाच. आठवड्यातून सुमारे 2 ते 3 वेळा डीप कंडिशनिंग आवश्यक आहे. जास्त प्रमाणात रसायन न लावण्याचा प्रयत्न करा आणि ते टाळूवर लावू नका. यामुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते.

केस धुतल्यानंतर केस नीट कोरडे करणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी नेहमी स्वच्छ कॉटन टॉवेलचा वापर करावा. हलक्या हातांनी टॉवेलच्या साहाय्याने केस कोरडे करा, जास्त जोर लावू नका. केस कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायर टाळा, कारण यामुळे केसांचे अधिक नुकसान होते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.

Non Stop LIVE Update
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.