Hair Care Tips | केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आरोग्यदायी पदार्थ खा आणि सुंदर केस मिळवा!

Hair Care Tips | केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे आरोग्यदायी पदार्थ खा आणि सुंदर केस मिळवा!
Image Credit source: wallpapercave.com

हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात. पालेभाज्या खाणे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्कीच करा. ते पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. पालकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असते. यामध्ये असलेले आयर्न केसांना निरोगी आणि मजबूत बनवण्याचे काम करते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 26, 2022 | 10:14 AM

मुंबई : कधीकधी खराब जीवनशैली (Lifestyle) आणि प्रदूषण यांचा आपल्या केसांवर खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत केसांची निगा राखण्यासाठी अनेकजण रसायने असलेली सौंदर्य उत्पादने वापरतात. ही उत्पादने आपल्या केसांचे नुकसान करतात. निरोगी केसांसाठी तुम्ही केवळ घरगुती उपाय करून बघू शकत नाही तर निरोगी आहार घेणे देखील तितकेच खूप महत्वाचे आहे. निरोगी आहार (Healthy diet) केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. पोषक तत्वांनी युक्त असलेले पदार्थ केसांना निरोगी ठेवण्याचे काम करतात, ते केसांशी संबंधित अनेक समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करतात. केसगळती टाळण्यासाठी आपण काही खास पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. यामुळे केसांच्या अनेक समस्या (Problem) दूर होण्यास मदत होते. हे पदार्थ नेमके कोणते आहेत, यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात. पालेभाज्या खाणे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश नक्कीच करा. ते पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. पालकामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असते. यामध्ये असलेले आयर्न केसांना निरोगी आणि मजबूत बनवण्याचे काम करते. यामुळे दररोजच्या आहारामध्ये किमान दोन पालेभाज्या नक्कीच घ्या.

अंडी

अंडी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. अंड्यामुळे केसांच्या त्वचेच्या आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अंडीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. अंडी देखील प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे, जे केस गळणे टाळण्यासाठी आवश्यक आहे. कमी प्रथिनेयुक्त पदार्थ केसांची वाढ कमी करतात. त्यामुळे केसगळती वाढते. यामुळेच जर तुम्हाला केस गळतीची समस्या टाळायची असेल तर तुम्ही दररोजच्या आहारामध्ये नक्कीच अंड्यांचा समावेश करा.

हे सुद्धा वाचा

अक्रोड

अक्रोडचे सेवन आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. रात्री अक्रोड पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी याचे सेवन करा. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, जस्त, सेलेनियम आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते. केस निरोगी ठेवण्यासाठी हे पोषक घटक आवश्यक आहेत, तुम्ही तुमच्या आहारात अक्रोडाचा समावेश करू शकता आणि सुंदर केस मिळू शकता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें