Skin Care Tips : निरोगी त्वचेसाठी होममेड फेस सीरम फायदेशीर, वाचा सविस्तर! 

फेस सीरम अलीकडे त्वचेची निगा राखणाऱ्या उत्पादनांपैकी एक बनले आहे. फेस सीरम त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. बरेच लोक त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सीरम निवडत नाहीत. त्यामुळे हानिकारक रासायनिक घटकांनी भरलेली उत्पादने त्वचेचे नुकसान करतात.

Skin Care Tips : निरोगी त्वचेसाठी होममेड फेस सीरम फायदेशीर, वाचा सविस्तर! 
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 1:05 PM

मुंबई : फेस सीरम अलीकडे त्वचेची निगा राखणाऱ्या उत्पादनांपैकी एक बनले आहे. फेस सीरम त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. बरेच लोक त्यांच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सीरम निवडत नाहीत. त्यामुळे हानिकारक रासायनिक घटकांनी भरलेली उत्पादने त्वचेचे नुकसान करतात. अशा परिस्थितीत तुम्ही रेडीमेड सीरमऐवजी होममेड फेस सीरम वापरू शकता.

डार्क स्पॉट्स, ब्लॅकहेड्ससाठी फेस सीरम

यासाठी तुम्हाला 2 चमचे मध आणि 1 चमचा लिंबाचा रस लागेल. दोन्ही साहित्य एका भांड्यात मिसळा. चेहऱ्यावर सीरम लावा. 15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा.

निस्तेज त्वचेसाठी फेस सीरम

जर तुमची त्वचा निर्जीव असेल तर हे फेस सीरम तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ते टाळावे. यासाठी तुम्हाला 1 टीस्पून खोबरेल तेल आणि 1/2 टीस्पून हळद पावडर लागेल. हे दोन घटक मिसळा आणि चेहऱ्याला लावा. काही मिनिटे ठेवा. त्यानंतर धुवा.

मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी

या फेस सीरममध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहे. जे तुम्हाला मुरुमांशी लढण्यास आणि तुमची त्वचा मऊ करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला 1 टेबलस्पून मध आणि 1 टेबलस्पून दालचिनी पावडर लागेल. एका भांड्यात मध आणि दालचिनी पावडर टाका. चांगले मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा.

तेलकट त्वचेसाठी फेस सीरम

तेलकट त्वचेमुळे ब्रेकआउट होतात. आपण घरगुती फेस सीरम देखील वापरू शकता. कोरफड आणि हळद वापरून तुम्ही फेस सीरम बनवू शकता. हे दोन्ही पदार्थ निरोगी त्वचेसाठी उत्तम घटक आहेत. यासाठी तुम्हाला 2 चमचे कोरफड आणि 1 चमचे हळद पावडर लागेल. एका भांड्यात जेल काढा. त्यात हळद घाला. आणि फेस सीरम तयार करा.

फेस सीरम

चेहऱ्यावरील उघड्या, मोठ्या छिद्रांमुळे खूप घाण होते. यामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि अस्वस्थ दिसते. आपण दूध आणि टोमॅटोपासून बनविलेले फेस सीरम वापरू शकता. यासाठी तुम्हाला 2 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचा टोमॅटोचा रस लागेल. ताज्या टोमॅटोचा रस काढून एका भांड्यात कच्च्या दुधात मिसळा. दोन्ही घटक मिसळा आणि हलक्या हातांनी चेहऱ्याला लावा. 15 मिनिटे ठेवा आणि कोरडे झाल्यानंतर सामान्य पाण्याने स्वच्छ धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Homemade face serum beneficial for healthy skin)

Non Stop LIVE Update
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.